ETV Bharat / health-and-lifestyle

व्हिटॅमिनच्या कमतरतेनं येतो राग! पहा व्हिटॅमिनची यादी - VITAMIN DEFICIENCY CAUSE ANGER

गोष्ट मनासरखी न घडल्यास चिडचिड होते. ज्याचं रुपांतर रागात होते. मात्र, राग येण्यामागे हे एकच कारण नाही. जाणून घ्या राग येण्याची कारणं.

Best Vitamins For Control Anger
अतिराग येण्याची कारणं (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 30, 2024, 8:01 AM IST

Best Vitamins For Control Anger: प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा नसतो. यामुळे एखादी गोष्ट मनासारखी न घडल्यास राग येणे सहाजिक आहे. काही लोकांना विनोद करणं आणि हसणं आवडते. परंतु अनेकाना लहान-सहान गोष्टींवरून राग येतो. ते लहान गोष्टीवरून देखील चिडचिड करतात. जास्त राग येण्यामागे आरोग्याशी निगडीत काही कारण असू शकतात. शरीरामधील काही व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे देखील राग आणि चिडचिड होवू शकते. जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वरीत राग येतो.

मॅग्नेशियम: शरीरातील मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तणाव व्यवस्थापण करण्यास अडचण होते. यामुळे देखील चिडचिड होवू शकते. मॅग्नेशियम हे असं खनिज आहे जे मज्जासंस्थेला पोषक घटक पुरवते. चिंता, अस्वस्थता, चिडचिड दूर करण्यास मॅग्नेशियम मदत करते.

झिंकची कमतरता: मूडस्वींग होण्यामागील मुख्य कारण म्हणजे झिंकची कमतरता. शरीरात झिंकची कमतरता भासल्यास तुम्ही नैराश्याचे शिकार होवू शकता. तसंच झिंकची पातळी कमी झाल्यास ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होवू शकते. हा तणाव तुम्हाला लगेच समजत नाही. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे वृद्धत्व, कर्करोग, हृदविकार तसंच इतर आजारांची लागण होवू शकते.

व्हिटॅमिन बी 6 : मेंदूचं कार्य सुधारण्याकरिता व्हिटॅमिन बी 6 महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता झाल्यास फील गुड हार्मोनची कमतरता होते. यामुळे अनेकांना राग येतो. फील गुड हार्मोनच्या कमतरतेमुळे मज्जासंस्था सुरळीत कार्य करत नाही. परिणामी चिडचिड आणि राग येतो.

व्हिटॅमिन बी 12 : शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाल्यास अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. अशक्तपणामुळे काम करण्याची इच्छा राहत नाही. अशा परिस्थित इतरांनी काम करण्यास सांगितलं किंवा तुम्ही स्वतःला कोणतेही काम करण्यास भाग पाडल्यास चिडचिड होणे सामान्य आहे. बहुतांश वेळा व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे नैराश्यासारखी लक्षणं जाणवू शकतात.

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10320003/#:~:text=A%20number%20of%20studies%20provide,community%2Dbased%20and%20psychiatric%20samples.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. तणाव एक, आजार अनेक; असे जगा ताणमुक्त जीवन
  2. या '5' गोष्टी सांगणार तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे
  3. रात्री झोप येत नाही? या ७ गोष्टी आजच आत्मसात करा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.