ETV Bharat / health-and-lifestyle

जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होऊ शकतात 'हे' आजार? अशी, काढा शरीरातील जीवनसत्त्वाची कमतरता भरून - Immunity Boosting Vitamins - IMMUNITY BOOSTING VITAMINS

Immunity Boosting Vitamins: जीवनसत्त्वे आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतात. तज्ज्ञांच्या मते, कमी प्रमाणात का होईना त्याचं सेवन करणं गरजेचं आहे. हे केवळ चयापचय योग्यरित्या चालवण्यास मदत करत नाही तर विविध रोगांपासून संरक्षण देखील करतात.

Immunity Boosting Vitamins
शरीरासाठी आवश्यक जीनवसत्त्वे (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 27, 2024, 1:32 PM IST

Immunity Boosting Vitamins: कोरोना सारख्या भयानक साथिनं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं किती आवश्यक आहे याची सर्वांना जाणीव करून दिली. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या अनेकांना यामुळं जीव गमवावा लागला होता. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास पाहिजे त्या प्रमाणात आपण आजारांशी सामना करू शकत नाही. रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास आपल्याला रोगांपासून संरक्षण मिळते. ही चांगली ठेवण्यासाठी जीवनसत्त्वं महत्तवाची भूमिका बजावतात. तज्ज्ञांच्या मते, रोज विशिष्ट जीवनसत्त्वं असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यानं आरोग्य चांगले राहू शकतं. चला तर जाणून घेऊया जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळं कोणत्या प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवतात.

व्हिटॅमिन 'सी': तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, व्हिटॅमिन 'सी' आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. असं म्हटलं जाते की, ज्या लोकांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता असते, ते लवकर आजारी पडण्याची शक्यता असते. म्हणूनच तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन सी समृद्ध असलेली फळे आणि भाज्या आपल्या रोजच्या आहाराचा भाग असावा. यामध्ये संत्री, लिंबू याशिवाय शिमला मिरची आणि पालक देखील खाण्याची शिफासर केली जाते.

Immunity Boosting Vitamins
व्हिटॅमिन सी (Getty Images)

व्हिटॅमिन ‘सी’च्या कमतरतेची लक्षणे : व्हिटॅमिन ‘सी’च्या कमतरतेमुळे शरीर थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचा पातळ होणे, लोहाची कमतरता, सांधेदुखी सारख्या समस्या उद्भवतात. तसंच काही वेळा दातांचा त्रास, हिरड्या सुजणे, रक्तस्त्राव अशा समस्या दिसून येतात, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

व्हिटॅमिन 'बी6': तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, व्हिटॅमिन 'बी6' रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य सुधारण्यास मदत करते. कोणत्याही संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ही जीवनसत्वं मदत करतात. डॉक्टरांच्या मते, आपण आपल्या रोजच्या आहारात केळी, मासे, चिकन, बटाटे आणि बीन्स सारख्या जीवनसत्व B6 समृद्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

Immunity Boosting Vitamins
व्हिटॅमिन बी6 (Getty Images)

व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेची लक्षणं: फिट, अपचन, अशक्तपणा, राग, त्वचा रोग, अशक्तपणा आणि पुरळ यासारखे रोग व्हिटॅमिन बी6 च्या कमतरतेमुळे होवू शकतात.

व्हिटॅमिन ई : व्हिटॅमिन ई आपल्या शरीरात एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. याला 'ब्युटी व्हिटॅमिन' असेही म्हणतात. हे जीवाणू, विषाणू आणि इतर संक्रमणांशी प्रभावीपणे लढते आणि आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्यापासून थांबवते. तसंच व्हिटॅमिन ई जीवनसत्व रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे रोजच्या आहारात सूर्यफुलाच्या बिया, बदाम, पालक, या जीवनसत्त्वानं युक्त इतर धान्यांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Immunity Boosting Vitamins
व्हिटॅमिन ई (Getty Images)

व्हिटॅमिन 'ई'च्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे : स्नायू कमकुवत होतात तसंच लाल रक्तपेशी कमी होतात. यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व, मासिक पाळी आणि गर्भपात होवू शकते असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणे आहे.

व्हिटॅमिन 'ए': व्हिटॅमिन ए च्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. गाजर, टरबूज, भोपळा यांमध्ये व्हिटॅमिन 'ए' भरपूर असते. यामुळे आहारात या पदार्थांचा समावेश कारावा.

Immunity Boosting Vitamins
व्हिटॅमिन अ (Getty Images)

‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे कोणती?: ‘ अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते. कोरड्या डोळ्यांना 'झेरोफ्थाल्मिया' असं म्हणतात. डोळ्याच्या पांढऱ्या भागावर डाग म्हणून पांढऱ्या रेषा दिसतात. त्यांना बाइटल थेंब म्हणतात. हे व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतात असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) नुसार, दर 6 महिन्यांनी शाळकरी मुलांना व्हिटॅमिन ए दिल्याने अंधत्व टाळता येऊ शकते.

व्हिटॅमिन 'डी': व्हिटॅमिन डीचे दाहक-विरोधी आणि इम्यूनोरेग्युलेटरी गुणधर्म रोगप्रतिकारक शक्तीला सक्रियपणे कार्य करण्यास आणि त्याचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे हे जीवनसत्व मिळविण्यासाठी तुम्ही पहाटेच्या सूर्यप्रकाशात अर्धा तास घालवावा. तसंच मासे, दूध आणि कडधान्येमध्ये व्हिटॅमिन डी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने जारी केलेल्या अहवालातनुसार जगातील 80 टक्के लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहेत.

Immunity Boosting Vitamins
व्हिटॅमिन डी (Getty Images)

‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे : लहान मुलांमध्ये जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस, रिकेट्स रोसेसियासारखे आजार होतात. ऑस्टिओमॅलेशिया आणि ऑस्टिओपोरोसिस प्रौढांमध्ये आढळून येते, असे संशोधनातून समोर आले आहे.

संदर्भ

https://www.nin.res.in/achievements.html#:~:text=Based%20on%20this%20study%20outcome,vitamin%20A%20deficiency%20(VAD).

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. ‘या’ पांढऱ्या विषापासून सावधान! अतिरिक्त सेवनामुळे होवू शकते गंभीर समस्या - How Much Sugar Eat In A Day
  2. दारू प्यायल्यानं लठ्ठपणा वाढू शकतो का? तज्ज्ञांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांसाठी दारू हानिकारक - Women and Alcohol

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.