ETV Bharat / health-and-lifestyle

लग्नानंतर आर्थिक गणित कसं मॅनेज करावं? जाणून घ्या टिप्स - HOW TO SAVE MONEY AFTER MARRIAGE

लग्नानंतर अनेकांच आर्थिक गणित बिघडतं. परंतु तुम्ही खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आर्थिक बचत करू शकता.

How To Save Money After Marriage
लग्नानंतर अशाप्रकारे करा आर्थिक गणित मॅनेज (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Nov 18, 2024, 2:33 PM IST

Updated : Nov 18, 2024, 2:41 PM IST

How To Save Money After Marriage: लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात. जबाबदऱ्या वाढतात यामुळे आर्थिक नियोजनाबाबद गांभर्यानं विचार करावा लागतो. तसं न केल्यास भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. परंतु तुम्ही खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यात तर कधीही आर्थिक चणचण भासणार नाही.

  • बचत करण्यावर लक्ष केंद्रीत करा: लग्न झाल्यानंतर खर्चात वाढ होते. कारण, आपल्यापैकी अनेक जण कोणताही विचार न करता खर्च करतात. परंतु, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च करण्याबरोबरच बचत करण्यावरही लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. अनावश्यक खर्च टाळा. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किफायतशीर पर्याय शोधा. कारण बचत केलेले पैसे भविष्यात तुमच्याच कामात येतील. यामुळे आजपासून बचत करण्याकडे लक्ष केंद्रीत करा.
  • खर्चाचे व्यवस्थापन करा: जॉब करत असणाऱ्यांचा खर्चावर नियंत्रण नसतो. त्यामुळे सर्वात आधी खर्चावर व्यवस्थापण करणे शिकून घ्या. आपला पैसा कुठ खर्च होतो याची माहिती ठेवा. पैसे खर्च करताना विचार करून खर्च करा. अनावश्यक खर्च लगेच बंद करा. यासाठी महिन्याभराचा बजेट आखा आणि त्यानुसार खर्च करा. कमाईपेक्षा जास्त पैसे मौजमस्तीवर खर्च करू नका. यामुळे तुमच्या पैशाची बचत होईल.
  • फिरण्यासाठी फंड तयार करा: आपल्यापैकी बऱ्याच जणांना फिरणं आवडते. बहुतांशजण दरवर्षी नवनव्या ठिकाणी फिरायला जाणं पसंत करतात. परंतु, लग्न झाल्यानंतर अनेकाच्या जाबाबदाऱ्या वाढतात यामुळे फिरायला जाणं अशक्य होत नाही. अशी अडचण येवू नये म्हणून लग्नानंतर फियरण्यासाठी एक फंड तयार करा. प्रत्येक महिन्यात यात काही पैसे त्यात घालत चला. हळूहळू पैसे जमा केल्यामुळे तुम्हाला फिरायला जाण्यासाठी आर्थिक बोझा वाटणार नाही.
  • सेवा निवृत्ती नियोजन: पन्नाशी नंतर आपल्याकडे निवृत्तीचे नियोजन असायला हवे. याकरिता तारूण्य काळापासूनच निवृती नियोजन करा. जॉब लागल्यानंतर निवृत्तीचे नियोजन केले नसाल तर लग्नानतंर अवश्य करा. कारण लग्नानंतर मुल जन्माला येतात यामुळे खर्च वाढतो. यामुळे तुम्ही सरकारी योजनांसोबतच तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणूक करू शकता. ज्यामुळे सेवनिवृत्तीनतंर तुमच्यावर ताण पडणार नाही.

हेही वाचा

  1. सावधान! तुम्ही पाणी गरम करण्यासाठी रॉड हीटर वापरता का? पडू शकते महागात
  2. घर-बसल्या अशाप्रकारे तपासा रोगप्रतिकारक शक्ती
  3. सावधान! वॉशिंग मशीन वापरताना तुम्ही सुद्धा 'या' चुका करता का?

Last Updated : Nov 18, 2024, 2:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.