ETV Bharat / health-and-lifestyle

हळद खाणे किती सुरक्षित? आयुर्वेद काय सांगतो, जाणून घ्या फायदे आणि तोटे - Benefits of Turmeric

author img

By ETV Bharat Health Team

Published : Aug 25, 2024, 9:00 AM IST

Benefits of Turmeric : मसाल्यांमध्ये हळदीला विशेष स्थान असतं. अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिइंफ्र्लेमेटरी गुणधर्मामुळे हळदीला औषध म्हणूनही वापरलं जातं. या व्यतिरिक्त आयुर्वेदामध्ये हळदीचा उपयोग केला जातो. खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून दुधामध्ये हळद टाकून पितात. या व्यतिरिक्त हळदीचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. वाचा पूर्ण बातमी..

Benefits of Turmeric
हळद खाणे किती सुरक्षित? (ETV Bharat)

हैदराबाद Benefits of Turmeric : आपल्या स्वयंपाक घरात अनेक मसाले असतात. त्यामधील एक आहे हळद. जवळपास सर्वच खाद्य पदार्थांमध्ये हळदीचा उपयोग केला जातो. यामुळे जेवणाची चव जरी वाढत नसली, तरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अनेक लोकं डाळ आणि भाज्यांमध्ये हळदीचा उपयोग करतात. याव्यतिरिक्त याचे आयुर्वेदीक फायदे देखील आहेत. दुखापत झाली की त्यावर हळद सोडून त्याचा अँटिसेप्टिक औषधीप्रमाणे उपयोग केला जातो.

चीन आणि भारतातील पारंपारिक चिकित्सा पद्धतींमध्ये हळदीचा पूर्वापार वापर होत आला आहे. तज्ज्ञांच्या मते यामध्ये प्रचूर प्रमाणात फायटोन्युट्रिएन्ट्स असतात. हे फायटोन्युट्रिएन्ट्स प्रदुषणाचे घातक कण आणि सुर्याच्या प्रखर किरणांना कमजोर करतात. त्यामुळे शरीरातील पेशींनना सुरक्षा प्रदान करता येतं. हळदीचे पाणी सुद्धा आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. या ऐवजी हळदीचे विविध उपयोग आहेत. ते आपण जाणून घेउयात.

आरोग्यसह सुंदरता ही वाढवते हळद : मसाल्याच्या डब्यात हळद पावडर सर्वात खास मसाला असतो. सहसा प्रत्येक भाजीमध्ये त्यास टाकलं जातं. अनेक रोगांवर उपाय म्हणून हळद वापरली जाते. त्यामुळे घरगुती औषध म्हणून हळद सर्वत्र प्रसिद्ध आहे. या ऐवजी आपल्या चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी किंवा ती टिकवून ठेवण्यासाठी महिला हळदीचा उपयोग करतात. अंतर्गत आरोग्यसाठीच नाही तर त्वचा व केसं निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा हळद लाभदायक आहे. त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि मुरुमांवरसुद्धा हळद उपायकारक आहे.

कच्च्या हळदीचे फायदे : भोपाळचे आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर राजेश शर्मा सांगतात की, निसर्ग आपल्याला गरजेनुसार संसाधनं उपलब्ध करुन देतो. विविध ऋतुमानात साधारण ते गंभीर स्वरुपाच्या सर्व समस्यांवर निसर्गाजवळ उपाय असतात. सामान्य हळदीपेक्षा कच्च्या हळदीचं सेवन फायदेशीर ठरतं. कच्ची हळद आल्याप्रमाणे दिसते आणि हिवाळ्यामध्ये बाजारात ती सहज उपलब्ध होते. कँसर सारख्या अनेक गंभीर आजारांवर औषध म्हणून वापरता येतं. शरीरातील शुगर लेव्हल स्थिर ठेवणं व पोटातील चर्बी कमी करण्यास त्याचा फायदा होतो. हेल्थलाईनच्या एका रिपोर्टनुसार हळद शरीरातील अँटिऑक्सिडंट क्षमता वाढवण्यास मदत करते.

या लोकांनी हळदीचे सेवन टाळावे : गर्भवती स्तनदा मातांनी हळदीचे सेवन करू नये. त्याचप्रमाणे पित्ताशयाने ग्रस्त व्यक्तिनेही ते टाळावं. ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे त्यांनी हळदीचं मर्यादित सेवन करायला हवं.

कसं करावं सेवन : डॉ. राजेश यांच्यानुसार, हिवाळ्याच्या दिवसात नियंत्रित मात्रेत आहारात हळदीचा उपयोग करावा. दुधामध्ये उकळून किंवा त्याचा चहा पिल्याने सरळ लाभ होतो. अनेक लोकं भाजी, सूप, सॅलड, शरबत, लोंणच तथा चटण्यांमध्ये सुद्धा हळदीचा उपयोग केला जातो.

किती सुरक्षित आहे हळद ? आजपर्यंत हळदीमुळं प्राणी किंवा मनुष्यांवर कोणत्याही प्रकारचा अपाय झाल्याचं कोणतंही अध्ययन समोर आलेलं नाही. त्यामुळे हळद विषयुक्त नाही हे स्पष्ट आहे. खाद्य आणि औषध प्रशासन (FDA) ने हळदीचे अनेक परिक्षणं केले आहेत. त्यानुसार यामधील सक्रिय घटक कर्क्यूमीनला सुरक्षित मानलं आहे.

अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK92752/#:~:text=The%20activities%20of%20turmeric%20include,%2C%20radioprotective%2C%20and%20digestive%20activities.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

शेवग्याची पानं चघळण्याचे चमत्कारिक फायदे; 'या' आजारापासून होते सुटका - Benefits Of Moringa Leaves

गॅसच्या समस्येनं त्रस्त आहात का? आरोग्यातील 'या' बदलानं समस्येतून होईल सुटका - Stomach Gastric Problem

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.