ETV Bharat / health-and-lifestyle

शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात - HOW TO REDUCE URIC ACID

अनेक वेळा शरीरातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. त्यामुळे आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. यावर पोषणतज्ञ डॉ.सुचरिता सेनगुप्ता यांनी काही उपाय सांगितले आहेत.

How To Reduce Uric Acid
युरिक अ‍ॅसिड (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Nov 11, 2024, 1:28 PM IST

How To Reduce Uric Acid: युरिक अ‍ॅसिड हे आपल्या शरीरात निर्माण होणारे एक टाकाऊ पदार्थ आहे. जे शरीरात प्यूरिन नावाचं रसायन विरघळल्यानं तयार होते. त्याला फिल्टर करण्याचे कार्य मूत्रपिंड करते. परंतु कोणत्याही कारणास्तव ते वाढल्यास आरोग्याविषयक अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. सांध्यामध्ये युरिक ॲसिड साचल्यास असह्य वेदना होतात आणि चालताना त्रास होतो. त्यामुळे युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवणं महत्त्वाचं आहे. यासाठी जीवनशैली आणि आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.

पोषणतज्ञ डॉ. सुचरिता सेनगुप्ता यांच्या मते, आपल्या शरीरात प्युरीन नावाच्या पदार्थाच्या विघटनाने यूरिक ॲसिड तयार होतो. हा पदार्थ शरीरातून मूत्राच्या स्वरूपात मूत्रपिंडांद्वारे बाहेर टाकला जातो. परंतु मूत्रपिंड नीट काम करत नसल्यास किंवा शरीरात प्युरीनचं प्रमाण जास्त वाढल्यास, युरिक अ‍ॅसिड रक्तात जमा व्हायला सुरुवात होते.

  • युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय खावे?
  • पोषणतज्ञांच्या मते, यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खाली दिलेले पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत.
  • फळे आणि भाज्या: बहुतेक फळे आणि भाज्यांमध्ये प्युरिनचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करते.
  • धान्य: ब्राऊन राईस, ओट्स आणि बार्ली यांसारख्या धान्यांमध्ये भरपूर फायबर असते. ते यूरिक ॲसिड कमी करण्यास मदत करतात.
  • पाणी: भरपूर पाणी प्यायल्याने किडनी निरोगी राहते. तसंच शरीरातील युरिक ॲसिड बाहेर टाकले जाते.
  • ग्रीन टी: ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे जळजळ आणि यूरिक ॲसिड कमी करण्यास मदत करतात.
  • ऍपल सायडर व्हिनेगर: सकाळी गरम पाण्यासोबत ऍपल सायडर व्हिनेगर प्यायल्यास युरिक ॲसिड कमी करण्यासाठी मदत होवू शकते.
  • अननस: यामध्ये ब्रेमेलिंग एन्झाइम असतात. जे युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
  • पिकलेली पपई: पोषणतज्ञ म्हणतात की, पपई खाणे फायदेशीर आहे. परंतु पिकलेल्या पपईमध्ये पपेन नावाचं एन्झाइम आढळतात. जे यूरिक अ‍ॅसिडमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
  • आवळ्याचं ज्यूस: आवळ्याचं रस रोज सेवन करणे युरिक ॲसिडसाठी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
  • युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय खाऊ नये?
  • युरिक ॲसिड वाढवणारे पदार्थ टाळावेत उदाहरणार्थ, भाज्या खाणे चांगले आहे. परंतु पालक शरीरासाठी फायदेशीर असले तरी युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास ते खाणे टाळावे.
  • लाल मांस: गोमांस, डुकराचे मांस इत्यादी लाल मांसामध्ये भरपूर प्युरिन आढळतात. सोयाबीन, मसुरी डाळही टाळावी. त्याचबरोबर अतिरिक्त चरबी असलेले पदार्थ, सीफूड खाणं टाळावं.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. किडनी स्टोनच्या समस्येनं त्रस्त आहात? जाणून घ्या या काय खावं आणि काय खाऊ नये
  2. काय आहे 'रेनबो डाएट'; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.