ETV Bharat / health-and-lifestyle

कोलेस्टेरॅालच्या समस्येनं त्रस्त आहात? आहारात समावेश करा 'हे' घटक - How to Lower Cholesterol - HOW TO LOWER CHOLESTEROL

How to Lower Cholesterol: बदललेल्या जीवनशैलीमुळे बरेच लोक उच्च कोलेस्टेरॉलच्या समस्येनं ग्रस्त आहेत. यामुळे ते दररोज कोलेस्टेरॉल कमी करण्याचा प्रयत्न करतात. कित्येक उपाय करुनही शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होत नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते, आपल्या दैनंदिन आहारात काही बदल केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते. वाचा सविस्तर

How to Lower Cholesterol
कोलेस्ट्रेरॉलच्या समस्येनं त्रस्त (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 11, 2024, 5:06 PM IST

Updated : Sep 11, 2024, 5:16 PM IST

How to Lower Cholesterol : अयोग्य अहार पद्धतीमुळे अनेकांना कोलेस्टेरॅालच्या समस्येशी सामना करावा लागतो. लहानांपासून मोठे देखील या समस्येचे बळी पडत आहेत. विशेष म्हणजे शरीराच्या मर्यादेपलीकडे कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास हृदयविकाराचा झटका तसंच अन्य भयावह आजाराची लागण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे.

कोलेस्टेरॉलचे प्रकार : आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आहेत. एक एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल आणि एचडीएल चांगलं कोलेस्टेरॉल. एलडीएल कोलेस्टेरॉल हे नसांमध्ये सापडणारं एक प्रकारचं फॅट आहे. यामुळे धमन्या ब्लॉक होतात. खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होते. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. यामुळे आपल्यापैकी बहुतांश लोक खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. काही जण अन्न कमी खातात. काही लोक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी गोळ्या देखील घेतात. परंतु, आहार घेण्याच्या पद्धतीत थोडेफार बदल केले तर, तुम्ही देखील कंटाळवाणे औषधं न घेता कोलेस्टेरॉलची पातळी कमी करु शकता. त्यासाठी तंज्ज्ञांनुसार काय करावे, जाणून घेऊयात.

आपल्या अन्नात 20 टक्के कोलेस्टेरॉल: बहुतेक लोकांना माहित नसतं की, आपण खातो त्या अन्नाद्वारे फक्त 20 टक्के कोलेस्टेरॉल तयार होतो. शरीरातील यकृत आणि आतडे उर्वरित कोलेस्टेरॉल तयार करतात. तसंच आपण खात असलेल्या अन्नातील बहुतेक कोलेस्टेरॉल हे मांस आणि दुग्धपदार्थांपासून तयार होते. त्याचं मुख्य कारणं म्हणजे त्यातील सॅच्युरेटेड फॅट्स. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सॅच्युरेटेड फॅट्स कमी करणं आवश्यक: सर्वप्रथम आपल्या रोजच्या आहारातील सॅच्युरेटेड फॅट्स कमी करणं आवश्यक आहे. त्यासाठी आहारात चरबीयुक्त पदार्थांचा समावेश टाळा. त्याऐवजी काही प्रकारचे वनस्पती तेल, एवोकॅडो, मासे खावं. तज्ज्ञांच्या मते, फायबर-समृद्ध वनस्पती अन्न जसं की भाज्या, फळं, बीन्स, तृणधान्य आणि ओट्स दैनंदिन आहारात समाविष्ट करा. कारण हे सर्व वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं. तसंच चीजबर्गर, जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ टाळावेत.

तुमच्या आहारात यांचा समावेश करा: तज्ज्ञांच्या मते, खालील पूरक आहार एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

सायलियम हस्क(इसबगोल): हा प्लांटॅगो ओवाटा वनस्पतींच्या बियापासून बनवलेल्या फायबरचा एक प्रकार आहे. बद्धकोष्ठता रोखण्यासाठी हे खूप चांगलं काम करते. सायलियम हस्क (इसबगोल) किंवा पावडर वेफर्स, कॅप्सूलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्याचे औषधी गुणधर्म शरीरातील कोलेस्टेरॉलचे शोषण करतात. त्यामुळे थोडं सायलियम (इसबगोल)पावडर पाण्यात मिसळून किंवा कोणत्याही ज्यूसमध्ये मिसळून घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी करण्यास चांगली मदत होते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

2000 मध्ये "अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन" मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, एक किंवा दोन महिने दररोज 5 ते 10 ग्रॅम सायलियम पावडर (इसबगोल) घेतल्यास एलडीएल कोलेस्टेरॉल सरासरी 6 टक्क्यांनी कमी होऊ शकतं.(नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन अहवाल) या संशोधनात अमेरिकेतील लेक्सिंग्टन येथील केंटकी विद्यापीठातील प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ डॉ.जेडब्ल्यू अँडरसन यांनी हा अभ्यास केला आहे.

प्लांट स्टेरॉल्स: नट, सोयाबीन आणि मटर यांसारख्या वनस्पतींच्या पेशीच्या पडद्यापासून बनवलेले प्लांट स्टेरॉल्स कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत, असं तज्ज्ञ म्हणतात. प्लांट स्टेरॉल्सना फायटोस्टेरॉल असंही म्हणतात. ते कॅप्सूल स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. काही अभ्यासातून असं दिसून आलं की, किमान आठ आठवडे दररोज 2 ग्रॅम प्लांट स्टेरॉल घेतल्यानं एलडीएल 10% पर्यंत कमी होऊ शकतो. तसंच लाल यीस्ट तांदूळासह तयार केलेले पूरक आहार देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, असं हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवाल नमुद केलं आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. किडनीच्या आजारानं त्रस्त आहात? नियमित खा 'ही' फळं किडनी राहील निरोगी - Kidney Detox These 5 Fruits
  2. सावधान! तुम्ही सुद्धा थेट गॅस फ्लेमवर पोळी शेकता का? पडू शकतं महागात - Can Roti Cause Cancer
  3. टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह म्हणजे काय? जाणून घ्या सुरुवातीची लक्षणं - Type1 And Type 2 Diabetes

Last Updated : Sep 11, 2024, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.