Beetroot Rava Laddu Recipe: बीटरूट खाणं अनेकांना आवडत नाही. बीटरूटचं नाव जरी घेतलं तरी काही जण नाक मुरडतात. यामुळे ते बीटरूटच्या आरोग्यदायी फायद्यापासून अलिप्त राहतात. बीटरूटमध्ये नायट्रेट्स पुरेशा प्रमाणात आढळते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहते. बीटमध्ये असलेल्या बीटा सायनाइनमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. आज आम्ही तुमच्याकरिता बीटरूटची एक खास रेसिपी घेऊन आलोय. ते म्हणजे बीटरूचे लाडू. जे तुम्ही आवडीनं खाणार.
- आवश्यक साहित्य
- बॉम्बे रवा - १ कप
- बीटरूटचे तुकडे - ३/४ कप
- साखर - 3/4 कप
- वेलची - ३
- तूप - चतुर्थांश वाटी
- काजू
- मनुका
- दूध - 1 कप
- लिंबाचा रस
- कृती: सर्वप्रथम तुम्ही बीटरूचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. तुम्ही बीटरूट किसून देखील वापरू शकता. आता एक पातीलं घ्या. त्यात दोन कप पाणी घाला. पाणी उकडल्यानंतर त्यात वेलची, साखर आणि तुप टाका आणि मंद आचेवर शिजवून घ्या. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. आता कडईमध्ये तुप टाका. गॅसवर ते तूप गरम झाल्यांतर त्यात रवा घाला. रवा लालसर होई पर्यंत भाजून घ्या. रवा भाजल्यानंतर त्यात बीटरूट मिश्रण टाका. मिश्रणात एक कप दूध, लिंबाचा रस आणि सुका मेवा टाका आणि मंद आचेवर शिजू द्या. आता तुमचं मिश्रण तयार आहे. या मिश्रणापासून हव्या तशा आकाराचे लाडू बनवा. तयार आहेत तुमचे बीटरूचे पौष्टीक लाडू.