How To Make Soft Chapati: डाळ, भात, भाजीसह चपाती हा जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु काही लोकांच्या चपात्या पापडासारख्या कडक तर काहींच्या चपात्या खूप पातळ किंवा जाड होतात. अनेकदा चपात्या फुगतदेखील नाहीत. मऊ चपाती खायला सर्वांना आवडतात. मात्र, क्वचितच लोकांना तशा चपात्या जमतात. मऊ चपाती तयार करणे ही एक कला आहे आणि प्रत्येकाला ही कला अवगत होईल, असं नाही. परंतु आम्ही सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही पीठ मळल्यास हमखास तुमची चपाती कापसासारखी मऊ अन् लुसलुशीत होईल. चला तर जाणून घेऊ यात मऊ चपाती बनवण्याची योग्य पद्धत.
मऊ अन् लुसलुशीत चपाती बनवण्याची पद्धत
- सर्वात आधी गव्हाचं पीठ चाळून घ्या.
- त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.
- त्यानंतर पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्या. लक्षात ठेवा कणिकामध्ये थोडं-थोडं पाणी घाला.
- चपात्यांना मऊ आणि चवदार करण्यासाठी चपाती करताना एक चमचा तूप किंवा तेल घाला.
- किमान 15 ते 20 मिनिटं पीठ झाकून ठेवा.
- हाताला पुन्हा थोडं तेल लावून कणीक व्यवस्थित करा.
- पिठाचे लहान-लहान गोळे तयार करा.
- लाटण्याची प्रक्रिया सुरू करा. हे करताना हातावर जास्त दाब देऊ नका.
- तवा गरम करायला ठेवा. गरम झालेल्या तव्यावर थोडं तेल घाला.
- तेल घालून झाल्यावर चपाती टाका.
- पहिल्या बाजूनं चपाती शेकताना गॅस फ्लेम कमी ठेवा.
- दोन्ही बाजूने चपाती व्यवस्थित शेकून घ्या.
- नंतर तूप लावा. झाली तुमची मऊ आणि लुसलुशीत चपाती तयार.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)