हैदराबाद Jowar Roti Recipe : चुकीचं खानपान आणि अयोग्य लाइफस्टाईलमुळे जगातील निम्म्याहून जास्त लोक मधुमेहाच्या विखळ्यात अडकलेले आहे. मधुमेही रूग्णांना खानपानाबद्दल बरेच पथ्य पाडावी लागतात. परंतु ज्वारी पासून तयार केलेले पदार्थ वजन वाढलेलेल्यासाठी आणि मधुमेह ग्रस्तांसाठी खूप उपयुक्त आहे.
ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी लागणारी साहित्य
- ज्वारीचं पीठ 1 कप
- पाणी 1 कप
- मीठ - चवीनुसार
- तूप - आवश्यकतेनुसार
ज्वारी रोटी रेसिपी
- सर्व प्रथम एक पातेला घ्या आणि त्यात एक कप पाणी घाला. हे पातेलं गॅसवर ठेवा. त्यात चिमूटभर मीठ घाला. पाणी चांगलं उकडू द्या आणि नंतर गॅस बंद करा.
- आता उकळलेल्या पाण्यात ज्वारीचं पीठ घ्याला. त्यावर झाकण ठेवा आणि चमच्यानं त्याला योग्य प्रकारे मिक्स करा. मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे थोडं थंड होईपर्यंत मिश्रण बाजूला ठेवा.
- टिप : ज्या कपानं पाणी घेतलं आहे. त्याच कपानं ज्वारीच पीठ घ्या. (लक्षात ठेवा जेवढ पाणी घ्याल तेवढचं पीठ घेणं आवश्यक आहे)
- पीठ थंड झाल्यावर एका मोठ्या परातामध्ये घ्या आणि पीठ मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्या.
- पीठ चिकट असेल तर त्यात थोडं आणखी ज्वारीचं पीठ घ्याला. जर पीठ जास्त घट्ट असेल तर हात ओलं करुन पीठ मळून घ्या.
- पीठ मळून झाल्यानंतर त्याचे समान आकाराचे गोले करून ते झाकून ठेवा. पीठ हवेच्या संपर्कात आल्यास ते कोरडे होण्याची शक्यता असते.
- यानंतर पोळपाट घ्या. त्यावर पिठाचा गोळा ठेवा. त्यावर पीठ शिंपडा आणि हाताने किंवा लाटण्याने भाकरी लाटून घ्या किंवा हाताने थापून द्या.
- लाटून किंवा थापून झाल्यानंतर भाकरी गॅसवरील गरम तव्यावर ठेवा. भाकरी मध्यम किंवा कमी फेमवर शिजवा. हळूहळू शिजवल्यामुळे भाकरी चांगली फूगते.
- ज्वारीची भाकरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )