ETV Bharat / health-and-lifestyle

मुलांमध्ये 'व्हिटॅमिन डी’ कमी झाल्यास या समस्या आहेत अटळ!

मुलांच्या वाढीसाठी केवळ अन्नच नाही तर इतर पोषक घटक देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. पालक म्हणून मुलांची जबाबदारी तुमच्यावर आहे.

Vitamin D for Child Growth
मुलांमध्ये 'व्हिटॅमिन डी’ कमी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : 4 hours ago

Vitamin D for Child Growth: आपल्याला शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात व्हिटॅमिन ‘डी’ला विशेष स्थान आहे. मुख्यत्वे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी फायदेशीर आहे. केवळ प्रौढच नाही, तर लहान मुलांसाठी ‘ड’ जीवनसत्त्व आवश्यक आहे. मुलांच्या वाढीसोबतच हाडं मजबूत ठेवण्याकरिता व्हिटॅमिन डी फार महत्त्वाची भूमिका बजावते, असं नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झालंय.

संशोधन काय म्हणते: खेळताना लहान मुलांना मार लागणं ही एक सामान्य बाब आहे. मार लागल्यामुळे प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसते. परंतु मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास जखम लवकर बरी होत नाही. जखम ठीक होण्यासाठी बराच काळ लागतो, अशी बाब अमेरिकन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स नॅशनलने केलेल्या एका अभ्यासात समोर आली आहे. संशोधकांनी 186 जखमी मुलांची तपासणी केली. त्यानंतर रेडियोग्राफिक निष्कर्षांशी तुलना करण्यात आली. यात मुलांच्या वाढीसाठी तसंच हाडं मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं स्पष्ट झालं. यामुळे मुलांना दररोज पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी ची मात्रा देणे गरजेचं आहे. हे पालकांनी लक्षात ठेवावं.

व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी हे पदार्थ खा: मुलांच्या वाढीमध्ये अन्न महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे मुलांना निरोगी आणि सशक्त व्हायचे असेल तर त्यांच्या दैनंदिन आहारात योग्य पोषक घटक आवश्यक असल्याचे पोषणतज्ञांचं म्हणणं आहे. पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मासे , फळं आणि तृणधान्यांचा रोजच्या आहारात समावेश करावा. कारण यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. त्याचबरोबर मुलांना रोज घराबाहेर खेळण्याची संधी द्या. मुख्यतः त्वचा कोरडी होईपर्यंत सूर्यप्रकाशात मुलं खेळली पाहिजे. म्हणजेच वीस मिनिटं ते एक तास मुलांना घराबाहेर खेळू द्या. त्यामुळे हाडे मजबूत होतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. रात्री झोप येत नाही? या ७ गोष्टी आजच आत्मसात करा
  2. नैसर्गिक प्रसूतीसाठी फायदेशीर आहेत ‘या’ बिया; फायदे वाचून व्हाल हैरान
  3. 'या' पाच प्रकारच्या लोकांना असू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.