Milk Aversion During Pregnancy: पोटात बाळ निरोगी रहावं म्हणून गरोदरपणात संतुलित आहार घ्यायला हवे. त्यामध्ये सर्वोत्तम पर्याय आहे दूध. गरोदर महिलांच्या आहारात दुधाचा समावेश असावा, असा डॉक्टर सल्ला देतात. मात्र, काहींना दुधाकडे पाहून मळमळ होते. तसंच दूध प्यायल्यामुळे अनेकांना गॅसची समस्या देखील उद्भवते. परंतु, दूध हे पूर्णअन्न म्हणून ओळखलं जात आणि ते गरोदर महिलांनी पिणं फायदेशीर आहे. जर तुम्ही थेट दूध पिऊ शकत नसाल तर दूधामध्ये काही पदार्थ मिसळल्यास हमखास दूध पिऊ शकता. यामुळे शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून निघू शकते.
- आवडत नाही म्हणून पिणं बंद करू नका: गरोदर महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. बाळ जन्मण्यापूर्वी गरोदर महिलांनी संतुलिन आहार घेणे अत्यंत आवश्यक असते. असे काही पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश करण्याची शिफारस गरोदरपाणात केली जाते त्यापैकी एक आहे दूध. गरोदरपणात शरीरात अनेक बदल होतात. या संप्रेरक बदलांमुळे चव, वासासंबंधित संवेदनशीलता वाढू शकते. यामुळे काही पदार्थ आपल्याला आवडत नाहीत. परिणामी उलट्या होतात. परंतु काही आठवडे गेल्यानंतर या भावना कमी होत जातात. त्यामुळे दूध आवडत नाही म्हणून ते पिणं बंद करू नका.
"दरोदरपणामध्ये दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा आहारात समवेश असणं गरजेचं आहे. यामुळे बाळ आणि आईला सर्व पोषकतत्त्वे मिळतात. दूध शरीराला आवश्यक अमिनो ॲसिड पुरवतं. त्याबरोबर त्यातून कॅल्शियम, व्हिटॅमिन-डी, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक मिळतात. गरोदरपणामध्ये, तुम्ही दररोज 400-600 मिली दूध प्यावं तसंच 100 मिली दही आणि 30 ग्रॅम पनीर घेता येता येवू शकते, असं पोषणतज्ञ डॉ. लताशी यांचं म्हणणं आहे.
- हे पदार्थ टाकून वाढवा दूधाचा टेस्ट
जर तुम्ही थेट दूध पिऊ शकत नसाल तर दुधात वेलची, हळद, काजू यापैकी काही पदार्थ मिक्स करून प्यावं. तसंच, दुग्धजन्य पदार्थ, फ्रूट कस्टर्ड, पॅनकेक्स आदीचा समावेश आहारत करावा. गॅसचा त्रास असणाऱ्यांनी थंड दूध पिणं चांगलं. रोज दूध प्यायल्यानं तुम्हाला त्रास होणार नाही. गरोदरपणात दूध प्यायल्यानं आई आणि बाळाला निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळतात, असं डॉक्टर लताशी यांनी सांगितलं.
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3505908/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा