Real Cashew VS Fake Cashew: सर्वात आतुरतेनं आपण वर्षभर ज्या सणाची वाट पाहतो, तो सण म्हणजे दिवाळी. दिवाळीला फराळासोबतच सुक्या मेव्याला बाजारात मोठी मागणी असते. त्यातही सर्वाधिक डिमांड असते काजू या ड्रायफ्रुटची. मोठ्या मागणीमुळं बाजारात कमी दर्जाचा काजूसुद्धा सर्रास विकला जातो. ज्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची सुद्धा शक्यता असते. काजूचा दर्जा कसा ओळखावा याबाबत आपण जाणून घेऊयात.
- रंग पहा: वास्तविक काजू पांढऱ्या किंवा ब्राऊन रंगाचे असतात. मात्र, पिवळसर किंवा गडद ब्राउन रंगाचे काजू दिसल्यास ते न खरेदी केलेलच बरं. कारण पिवळ्या रंगाचे काजू कमी दर्जाचे असू शकतात. त्यामुळे तुम्ही नेहमी पांढरे किंवा ब्राऊन रंगाचे काजू खरेदी करावे.
- डाग: दर्जेदार काजू काळे डाग आणि छिद्रांपासून मुक्त असतात. तेच कमी दर्जाच्या काजूंवर डाग असतात. त्यामुळे काजू खरेदी करताना त्यांच्यावर काळे डाग दिसल्यास ते खरेदी करु नये.
- जास्त काळ टिकतात: मेलू जातीचे काजू लवकर खराब होत नाहीत आणि जास्त काळ ताजे राहतात. तेच खालच्या प्रतिचे काजू लवकर खराब होतात. त्यात किडे आणि जंतही तयार होऊ शकतात. दर्जेदार काजू किमान 6 महिने टिकतात. त्यामुळे काजू खरेदी करण्यापूर्वी चांगलं तपासून घ्यावं असं जाणकारांनी सांगितलं.
- आकार तपासला पाहिजे: चांगल्या दर्जाचे काजू सुमारे एक इंच लांब आणि थोडे जाड असतात. लक्षात ठेवा जर काजू लहान आणि पातळ असतील तर ते खराब काजू आहेत. लहान आणि पातळ काजू खरेदी न करणं योग्य आहे. काजू खरेदी कराताना आकाराकडे आवर्जून लक्ष द्या.
- चव: तुम्ही बाजारात काजू खरेदी करता तेव्हा दुकानदाराला दोन-तीन काजू मागवून खा. चांगल्या प्रतीचे काजू दातांना चिकटत नाहीत. कमी दर्जाचे काजू दातांना चिकटतात. तसंच वास्तविक काजूचे सहजपणे तुकडे होतात. दर्जेदार काजू चवीला छान लागतात. तेच वाईट काजू कडू असतात.
- चांगले काजू पाण्यात बुडतात: तुम्ही विकत घेतलेले काजू दर्जेदार आहेत की नाही हे पाण्याच्या चाचणीवरून ठरवू शकता. यासाठी एक ग्लास पाण्याने भरा आणि त्यात काजू घाला. अर्ध्या तासानंतर तपासा. चांगले काजू पाण्यात बुडतात. तर कमी प्रतिचे काजू पाण्यावर तरंगतात.
- किंमत: चागल्या प्रतिचे काजू महाग असतात. बनावट काजू स्वस्त दरातही मिळतात. यामुळे काजू खरेदी करताना किमतीकडे लक्ष द्यावं. तसंच चांगल्या प्रतिचे काजू जड असतात.
- वास्तविक काजूचा वरचा भाग गुळगुळीत असतो. तोच दर्जाने कमी असलेला काजू उग्र असू शकतो. त्यामुळे काजू खरेदी करण्यापूर्वी ते हातात घेऊन तपासा, असं जाणकारांनी सांगितलं.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.)