नाशिक : हिवाळ्यात थंड वातावरण असल्यानं घाम येत नाही, त्यामुळे आपल्याला तहान लागत नाही. परिणामी या दिवसात पाणी पिण्याचं प्रमाण कमी असल्यानं डिहायड्रेशन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या काळात होणाऱ्या डिहायड्रेशनची कारणं, लक्षणं आणि त्यावर उपाय जाणून घेणं गरजेचं आहे.
डिहायड्रेशन म्हणजे काय ? : सर्वसाधारण डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाणी कमतरतेचा त्रास होणं. मात्र हा त्रास आपल्याकडं फक्त उन्हाळ्यात होतो. कारण उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी बाहेर पडते. यामुळे आपल्याला सतत तहान लागते आणि अशात पुरेसं पाणी पिलं नाही, तर डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो. पण बऱ्याच जणांना असाच डिहायड्रेशनचा त्रास हिवाळ्यातही होतो. कारण हिवाळ्यात थंड वातावरण असल्यानं घाम येत नाही. त्यामुळे आपल्याला तहान लागत नाही. परिणामी या दिवसात पाणी पिण्याचं प्रमाण कमी होते. जे आपल्या शरीराला जाणवत नाही, पण त्यामुळे शरीराला पुरेसं पाणी न मिळाल्यानं डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो.
कोणती आहेत हिवाळ्यातील डिहायड्रेशनची लक्षणं : हिवाळ्यात बऱ्याचदा आपल्याला कमी तहान लागते, शरीरातील पाणी कमी झाल्यावर थकवा जाणवतो, हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी दिसू लागते, शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर चक्कर येते, डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीचा त्रास जाणवतो, पाण्याच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि अॅसिडिटी, पित्ताचा त्रास जाणवतो. डिहायड्रेशनचा गंभीर परिणाम झाल्यास किडनीचे आजार, हृदयविकार आणि मृत्यू सुद्धा ओढवू शकतो.
अशी घ्या काळजी : डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये, यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यावं, कॉफी, सूप, गरम चहा इत्यादी पिल्यानं तुमचं शरीर गरम तर राहतेच शिवाय हायड्रेटही राहते. हिवाळ्यात भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही कलिंगड, काकडी, संत्री, गाजर तसेच इतर फळांचा आहार घेतल्यास फायदा होतो. या दिवसात साखर तसेच मीठ कमी प्रमाणात खावं, यामुळे मधुमेह, बीपीचा त्रास नियंत्रणात राहील.
हेही वाचा :