हैदराबाद How Much Water in a Day : पाणी हे अर्थातच महत्वाचं आहे. पाण्यातून पोषकद्रव्य आणि निरुपयोगी पदार्थांचं शरीरात वहन होत असतं. शरीरात होणाऱ्या बहुतेक सगळ्या रासायनिक अभिक्रियामध्ये पाणी मुख्य भूमिका बजावत असतो म्हणून पाणी पिणे ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या शरीरात पाण्याच प्रमाण 70 टक्के असते. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी तसंच तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी महत्तवाची भूमिका बाजावतो. पाणी प्यायल्यानं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसंच किडनी स्टोनसारख्या समस्याही उद्भवत नाहीत. व्यक्तीने दिवसभरात किती पाणी प्यावं हे वय, वजन आणि लिंगावर अवलंबून असते.
8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला : डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे गरजेचं आहे. परंतु जास्त पाणी प्यायल्याने पॉइजनिंग, इन्टॉक्सिकेशन किंवा मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होवू शकतो. तज्ज्ञांच्या मते दिसभरामध्ये 8 ग्लास म्हणजे किमान दोन लिटर पाणी पिणे बंधनकारक आहे. परंतु एकाच वेळी जास्त पाणी पीवू नये हळू हळू प्यावं.
जास्त पाणी प्यायल्यानं होणाऱ्यास समस्या : जास्त पाणी प्यायल्यानं ओव्हहायड्रेशनची समस्या सुरु होते. यामुळे मळमळ, उलट्या डोकेदुखी, हाय-पाय दुखणं, ओठांवर सूज अशा समस्छयाय उद्भवू शकतात. तसंच अधिक पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट लेव्हल देखील कमी होते. इलेक्ट्रोलाईट पातळी कमी झाल्यास मांसपेशीत वेदना, क्रॅम्प आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसंच कोमा किंवा मृत्यूचा देखील होवू शकतो.
लिंगानुसार किती पाणी प्यावं : पुरूषांनी दिवसाला 3.5 लिटर पाणी प्यायला हवं. तर महिलांनी दिवसातून 2.5 ते 3 लिटर पाणी पीणं आवश्यक आहे. मासिक पाळी दरम्यान, गर्भवती किंवा स्तनदा मातांना त्यापेक्षा अधिक पाणी प्यायलं पाहिजे. यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सस, इंजिनिअरिंग अॅंड मेडिसिनच्या अहवालानुसार पुरुष आणि स्त्रियांनी दिवसभरात किती पाणी प्यावं हे खालीलप्रमाणे आहे.
- निरोगी तरुणांना शरीराच्या वजनाच्या तुलणेत प्रति किलोग्रॅम 35 मिली पाण्याची आवश्यकता असते.
- 50 किलो वजनाच्या व्यक्तीनं दररोज 1.7 लिटर पाणी प्यावं
- 60 किलो वजन असलेल्या व्यक्तीनं नियमित 2.1 लिटर पाणी प्यावं
- 70 किलो वजनाच्या व्यक्तीनं कमीत कमी 2.4 लिटर पाणी प्याव
- 80 किलो वजनाच्या व्यक्तीनं दररोज 2.8 लिटर पाणी प्याव.
पाणी पिण्याचे नियम : आरोग्यदायी हायड्रेशनची पातळी राखण्यासाठी तहान लागण्यापूर्वी किंवा कोणातीही क्रिया करण्यापूर्वी पाणी प्यावं. जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या. कफ असेल तर जेवणाच्या 30 मिनिटांनी पाणी प्यायला हवं. कधीही नॉरमल पाणी प्यावं. थंड पाणी पीवू नये. पाणी ठेवण्यासाठी माती किंवा तांब्याच्या भांड्याचा वापर करावा.
लघवीवरुन पाण्याची पातळी ओळखा : पुरेशा प्रमाणात हायड्रेटेड असाल तर तुम्ही लघवीचा पारदर्शक रंग शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे आहे असं दर्शवितो. पिवळा रंग पाणी कमी आहे असं तर लघवी पांढऱ्या रंगाची होत असेल तर पाणी गरजेपेक्षा जास्त आहे. लघवीचा फिकट पिवळा रंग पाण्याचे योग्य प्रमाण दर्शवतो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )
हेही वाचा