ETV Bharat / health-and-lifestyle

'या' वनस्पतीची पानं औषधापेक्षा सरस, मधुमेहासह वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

कढीपत्ता कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. कढीपत्त्याच्या पानांचं नियमित सेवन केल्यानं कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रणात राहून अनेक आजार दूर होतात.

author img

By ETV Bharat Health Team

Published : 2 hours ago

Curry leaves health benefits
कढीपत्ता (ETV Bharat)

Curry leaves health benefits: फोडणीला चव देण्यासाठी कढीपत्ता जवळजवळ सर्व भारतीय स्वयंपाकघरात वापरला जातो. विशेषतः दक्षिण भारतात याशिवाय कोणत्याच भाजीची कल्पना करता येत नाही. कढीपत्त्याची हिरवी पानं जेवणाची चव तर वाढवतातंच शिवाय अनेक आजारांवर देखील ते रामबाण आहे. यामध्ये विविध जीवनसत्त्वं, लोह, प्रथिनं, फायबर, कॅल्शियम तसंच अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स आणि फिनोलिक्स सारखी संयुगे असतात. जी शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. वजन कमी करण्यापासून ते मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणापर्यंत आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत अनेक आरोग्यदायी फायदे देतात.

  • पचनक्रिया सुधारते: कढीपत्ता खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते. यातील पाचक एन्झाईम्स पचनास मदत करतात. यामुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवत नाही. तसंच पोट साफ करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
  • हृदय निरोगी: कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात. जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात. तसंच प्लेक तयार होण्यास प्रतिबंध करते. तसंच रक्तवाहिन्यासंबंधी आजारांवर हे उपयुक्त आहे. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी करतात आणि रक्त परिसंचरण सुधारतात.
  • रक्तातील साखरेचं नियंत्रण: कढीपत्त्याची पानं मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. काही अभ्यासानुसार कढीपत्ता खाल्ल्यानं रक्तातील साखर नियंत्रित राहते. कारण त्यात अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म असतात. हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करते.
  • दृष्टी सुधारते: कढीपत्त्यातील व्हिटॅमिन-अ दृष्टी सुधारते. कोरडे डोळे, काळे डाग आणि मॅक्युलर डिजेनेरेशन यासारख्या दृष्टी संबंधित समस्या टाळण्यास मदत करते.
  • मानसिक आरोग्य: कढीपत्ता आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तणाव आणि चिंता कमी करून त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
  • कॅन्सरविरोधी गुणधर्म: कढीपत्त्याच्या पानांमध्ये कॅन्सरविरोधी संयुगं असतात. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते. विशेषतः ल्युकेमिया आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये उपयुक्त आहे.
  • इम्युनिटी बूस्टर: या पानांमध्ये भरपूर व्हिटॅमिन-सी असल्यानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. फळामुळे शरीराला विविध रोग आणि संक्रमणांशी लढण्याची ताकद मिळते.
  • वजन कमी करणे: कढीपत्त्याच्या पानांमध्ये अल्कलॉइड्स असतात. ज्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. हे चयापचय वाढवते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. तसेच त्यात भरपूर फायबर असल्यानं वारंवार भूक लागत नाही.
  • कसे खावं?

तुम्ही रोज सकाळी कढीपत्त्याची ताजी पानं चावू खावू शकता. तसंच पानं बारीक करून पाण्यात मिसळू पाणी पिवू शकता. तसंच तुम्ही ही पानं उकडून त्याच पाणी पिऊ शकता. कोणत्याही प्रकारे सेवन केल्यास त्याचे आरोग्यदायी फायदे मिळतातच.

संदर्भ

https://www.carehospitals.com/blog-detail/health-benefits-of-curry-leaves/

https://www.healthline.com/nutrition/curry-leaves-benefits

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.

हेही वाचा

  1. काळवंडलेल्या मानेमुळे त्रस्त आहात? अशी करा चुटकीसरशी सुटका
  2. काळवंडलेल्या काखेमुळे परेशान आहात? हे घरगुती उपाय करून पहा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.