ETV Bharat / health-and-lifestyle

'या' हर्बल चहानी करा दिवसाची सुरुवात; रक्तदाब राहील नियंत्रणात - Herbal Tea Controls Blood Pressure - HERBAL TEA CONTROLS BLOOD PRESSURE

Herbal Tea Controls Blood Pressure: उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर आजार म्हणून ओळखला जातो. बहुतांश लोकांना रक्तदाबाची लक्षणं जाणवत नाहीत. परिणाम दिसेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. सध्या तरुणांमध्ये याचं जास्त प्रमाण पाहण्यास मिळत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी तज्ज्ञ विविध प्रकारचा ‘हर्बल टी’ घेण्याचा सल्ला देतात. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी सविस्तर वाचा.

Herbal Tea Controls Blood Pressure
हर्बल चहा (CANVA)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 12, 2024, 5:19 PM IST

Herbal Tea Controls Blood Pressure: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहारामुळे अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. हा आजार चोर पाऊलांनी आपल्या शरीरात प्रवेश करतो. एवढेच नाही तर त्या सोबत अनेक आजारांचा शिरकाव शरीरात होतो. उच्च रक्तदाबाच्या एकूण रूग्णांपैकी बहुतांश रूग्ण मधुमेह ग्रस्त असतात. यामुळे हृदविकार, पक्षाघात, मुत्रपिंडासंबंधित आजार, युरिक अ‍ॅसिडची समस्या देखील उद्भवू शकते. इतकेच नाही तर उच्च रक्तदाबामुळे दृष्टी देखील जाऊ शकते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची नितांत गरज आहे. परंतु महागडे औषधं किंवा आहारात मीठाचं प्रमाण कमी जरी केलं, तरी ही समस्या बरी होत नाही. पंरतु काही हर्बल टी प्यायल्यास रक्तदाबाची समस्या नियंत्रित करू शकता, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

हिबिस्कस चहा : हिबिस्कसच्या फुलांपासून बनवलेला चहा प्यायल्यानं रक्तदाब कमी होतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 2010 मध्ये जर्नल ऑफ ह्यूमन हायपरटेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हिबिस्कस चहा रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतो. हिबिस्कस सबडारिफा अर्क उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींचे रक्तदाब कमी करते, असा निकष काढण्यात आलाय. मेक्सिकन संशोधक ए. हेरेरा-अरेलानो यांनी हा अभ्यास केला होता. त्यात असं आढळून आलं की, हिबिस्कस चहाचे गुणधर्म रक्तवाहिन्या विस्तृत करतात आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतं. तसंच यात अ‍ॅंथोसायनिन्स आणि प्लेव्होनॉइड्स ही संयुगे असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यात उपयुक्त आहेत. चहा करण्यासाठी हिबिस्कसच्या काही पाकळ्या पाण्यात उकळवा आणि गाळून त्याला चहासारखं घ्या.

तुळशीचा चहा : आयुर्वेदात तुळशीला एक उत्कृष्ट औषधी वनस्पती मानलं जातं. तुळशीचा चहा प्यायल्यानं अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. विशेषतः उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तुळशीचा चहा फायदेशीर आहे.

बडीशेप चहा: बडीशेप पाण्यात उकळून चहा तयार केला जातो. या चहामधील अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

कॅमोमाइल टी: वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा सर्वोत्तम आहे. यात असलेले दाहक विरोधी गुणधर्म रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

आल्याचा चहा: उच्चरक्दाबाच्या रुग्णांसाठी आल्याचा चहा गुणकारी आहे. यात अनेक औषधी गुणधर्म असल्याचे तज्ज्ञ सांगतात. आल्याचे तुकडे पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्यावं, असं सांगितलं जाते. आल्याचा चहा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

अर्जुन बार्क चहा: अर्जुनाच्या झाडाच्या सालापासून बनवलेला चहा प्यायल्यानं उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

पुदिन्याचा चहा: पुदिन्याचा चहा पिणं शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यात असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तदाब कमी करतात.

दालचिनीचा चहा: दालचिनीपासून बनवलेला चहा प्यायल्यानं उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. दालचिनी चहा अँटिऑक्सिडंट्सनं समृद्ध आहे.

मध आणि लिंबू चहा: डॉक्टर म्हणतात की मध आणि लिंबू चहा प्यायल्यानं उच्च रक्तदाब नियंत्रित राहते. यातील अँटीऑक्सिडंट्स बीपी कमी करण्यास मदत करतात.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. कोलेस्टेरॅालच्या समस्येनं त्रस्त आहात? आहारात समावेश करा 'हे' घटक - How to Lower Cholesterol
  2. व्हिटॅमीन डी च्या कमतरतेनं आरोग्य धोक्यात! 'हे' पदार्थ घ्या आहारात, किडनी राहील निरोगी - Vitamin D Rich Foods

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.