ETV Bharat / health-and-lifestyle

केस गळतीवर रामबाण उपाय; ट्राय करून पहा

हिवाळा लागताच केस गळतीच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेक उपाय करून देखील केस गळती थांबत नाही. परंतु खाली देलेले उपाय केल्यास केसगळती थांबू शकते.

Hair Fall Prevention Tips
केस गळतीवर रामबाण उपाय (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 17, 2024, 5:32 PM IST

Hair Fall Prevention Tips: शरीरासाठी दही अत्यंत उपयुक्त असं दूग्धजन्य पदार्थ आहे. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्यापैकी बहुतेक लोकं दह्याचे विविध पदार्थ करून खातात. दह्यामध्ये प्रचूर मात्रेत प्रथिनं, जीवनसत्त्वं, कॅल्शियम, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि लॅक्टिक अ‍ॅसिड आहेत. हे सर्व घटक शरीरासाठी अत्यावश्यक आहेत. मात्र, दही हे केवळ आंतरीक आरोग्यसाठीच नाही तर केसांसाठी देखील तितकेच फायदेशीर असल्याचं तज्ञ सांगतात. दह्यानं बनवलेले काही हेअर पॅक केसांच्या विविध समस्या दूर करू शकतात. तसंच केसांच्या मुळांना ताकद आणि चमक प्रदान करतात. आम्ही तुमच्यासाठी दह्याचे असेच घरच्या घरी तयार करता येणारे पॅक घेऊन आलो आहोत.

  • दही आणि उडीद डाळपॅक: जर तुम्हाला तुमचे केस घट्ट आणि मजूबत करायचे असतील तर तुम्ही हा पॅक घरच्या घरी तयार करून वापरू शकता.
Hair Fall Prevention Tips
उडीद डाळ (ETV Bharat)
  • साहित्य
  • एक कप उडीद डाळ
  • अर्धा कप दही
  • पॅक तयार करण्याची कृती: उडीद डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी डाळीचं गुळगुळीत पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये दही घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण टाळू आणि केसांना लावा. अर्ध्या तासानंतर शॅम्पूनं केस धूवा. यामुळे तुमचे केस मजबूत, मऊ आणि सुंदर होतात. सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा हा पॅक लावा.
  • दही आणि मेथीदाणा पॅक: तुम्हाला स्प्लिट एंड्स आणि केस गळतीची समस्या असेल तर हा त्यावर रामबाण उपाय ठरू शकतो. यामुळे तुमचे केस तर चांगले होतीलच सोबत गेसगळती कायमची थांबेल.
Hair Fall Prevention Tips
मेथी दाणा (ETV Bharat)
  • आवश्यक साहित्य
  • दही - एक कप
  • मेथी - एक चतुर्थांश कप
  • पॅक कसा तयार करायचा? प्रथम मेथी दाणे हलक्या हातानं बारीक करून घ्या. मेथी पावडर दह्यात घालून घट्ट होईपर्यंत ढवळा. ही पेस्ट केसांच्या टोकापासून टाळूपर्यंत लावून ठेवा. ती तासभर तशीच ठेवा. यानंतर केस शैम्पूनं धुवा आणि कंडिशनर लावा. या पॅकमध्ये वापरण्यात येणारी मेथी केसांना निरोगी ठेवते. तसंच स्प्लिट एंड्स कमी करते. हे केस गळण देखील थांबवते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. काळवंडलेल्या मानेमुळे त्रस्त आहात? अशी करा चुटकीसरशी सुटका
  2. चमकदार चेहऱ्यासाठी वापरा भोपळ्याचा फेसपॅक; चारचौघात उठून दिसाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.