हैदराबाद Health Tips : कॉफीचे शौकीन जरा दुर्मीळच, पण चहा (Tea) हा आजकाल जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झालाय. जवळजवळ प्रत्येकजण दररोज सकाळी नाश्त्याबरोबर चहा पितात. बरेच लोक दिवसातून अनेक वेळा चहा पितात. अशा परिस्थितीत लोकांना चहाचं व्यसन लागण्याचा धोका असतो. अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. चहा कधीकधी खूपच महागात पडू शकतो. मात्र चहा घेताना काही गोष्टी केल्या तर त्याचे दुष्परिणाम खूपच कमी करता येतील. त्यासाठी इथे दिलेल्या टिप्स वापरून तुम्ही चहाचा आस्वाद घेवू शकता.
1- चहा जास्त वेळ उकळू नका : चहामध्ये काही घटक असतात (उदा-अल्कलॉइड्स) जे जास्त उकळल्यावर सक्रिय होतात. या घटकांचा तुमच्या शरीरावर आणि मेंदूवर खूप नकारात्मक परिणाम होतो.
2- खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नका : जेवणानंतर लगेच चहा प्यायल्यानं शरीरातील झिंक आणि लोहाचे शोषण कमी होते. ज्यामुळं शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते.
3- रिकाम्या पोटी चहा पिऊ नका : अनेकांना बेड टी किंवा उठल्यावर पहिल्यांदा चहा पिण्याची सवय असते, जी खूप धोकादायक आहे. यामुळं पोटात जळजळ होऊ शकते आणि तुम्हाला गॅसची समस्या देखील होऊ शकते.
4- चहा पुन्हा गरम करू नका : चहामध्ये साखर मिसळली जाते आणि म्हणून ती पुन्हा गरम केल्यावर साखरेमुळं बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते. यासोबतच त्याचा सुगंध आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मही कमी होतात.
5- दिवसभरात जास्त चहा पिऊ नका : डॉक्टरांच्या मते, दिवसातून एक किंवा दोन कपपेक्षा जास्त चहा पिऊ नये.
दिवसभरात किती कॅफिन सेवन करावे : आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार नियमित 150 मिलीलीटर कप कॉफीमध्ये 80 ते 120 मिलीग्राम कॅफिन असते. तसंच इंस्टेंट कॉफीत 50 ते 65 मिलीग्राम कॅफिनचं प्रमाण असतं. तसंच चहाच्या एका कपामध्ये 30 से 65 मिलीग्राम कॅफिनचं प्रमाण असतं. आयसीएमआरनुसार एका व्यक्तीनं दिवसभरात जास्तीत जास्त 300 मिलीग्राम कॅफिन सेवन केलं तर ते नॉर्मल आहे, असं म्हटलंय. दिवसभरामध्ये 2.5 कप कॉफी पिऊ शकता. तसंच 4.5 कप इंस्टेंट कॉफी तर साडेचार कप चहा पिऊ शकता. यापेक्षा अधिक कॉफी किंवा चहा सेवन केल्यास तुम्हाला अनेक समस्यांचा समाना करावा लागतो. मात्र वरील टिप्स पाळून चहा घेतला तर समस्या कमी करता येतात.
हेही वाचा -