हैंदराबाद : World AIDS Vaccine Day : एड्स आजार संपूर्ण बरा करण्यासाठी आजही वॅक्सीन उपलब्ध नाही. एड्स नाव उच्चारायला आजही लोक घाबरतात. त्यात टेस्ट पॉझिटिव्ह आली की मनात भीती, वेदना, आक्रोश, अवहेलना, अपराधाची भावना असा सारा कल्लोळ उभा राहतो. लोकांमधील ही भीती नाहीशी करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने १८ मे हा दिवस जागतिक एड्स लस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच एड्स आजारावर लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञांचं आभार मानण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो.
युएनएआयडीएस रिपोर्टनुसार
एचआयव्ही ही एक जागतिक महामारी आहे. या आजारामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. युएनएआयडीएस द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार सन २०२२ मध्ये १३ लाख एचआयव्ही पॉसिटिव्ह रुग्ण आढळले. तसेच यावर्षी ६ लाख ३० हजार लोक या आजाराच्या संक्रमनात आले आहेत. जगातील सात लोकांपैकी जवळपास एक व्यक्ती एचआयव्हीने ग्रस्त आहे. याला आळा घालण्याच्या उद्देशानं देखील जागतिक एड्स लस दिन महत्वाचा आहे.
वॅक्सीन डे इतिहास
१८ मे १९९८ रोजी पहिल्यांदा जागतिक एड्स लसीकरण दिवस साजरा करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी १९९७ मध्ये मार्गन स्टेट युनिव्हसिटीमध्ये दिलेल्या भाषणानंतर लसीकरण दिवस साजरा करण्यात यावा अशी जाणीव झाली. त्यांनी आपल्या भाषणात एड्सच्या निर्मूलनासाठी लस तयार करण्याच्या गरजेवर भर दिला होता. त्यानंतर एड्सची लस तयार करण्यासाठी संशोधकांनी वैज्ञानिक चाचण्यांवर भर देण्यास सुरुवात केली. एचआयव्ही विरुद्ध संरक्षणात्मक प्रभाव दर्शवणारी RV144ही पहिली चाचणी आहे. सन १९९७ मध्ये थायलंडमधील १६,००० पेक्षा जास्त लोकावर या चाचणीचे परिक्षण करण्यात आले होतं.
२०२२ जागतिक स्थरावरील आकडेवारीनुसार
- ३९ मिलियन(३९०लाख) एचआयव्हीग्रस्त रुग्ण वावरत होते.
- यात ३७.५ मिलियन वयस्कर ( १५ वर्षा पेक्षा जास्त वय असलेले), १५ लाख मुले (०-१४ वर्षे वयोगटातील) यामध्ये ५३ टक्के महिला आणि मुलींचा समावेश होता.
- १.३ मिलियन(१३ लाख) नवीन रुग्ण आढळले.
- ६३०,००० लोकाचं एड्स संबंधीत आजारानं मृत्यू पावले.
- २९.८ मिलियन लोक एंटीरेट्रोवाईरल थेरपीचा उपयोग करत होते.
- आफ्रिकन प्रदेशात एचआयव्ही रुग्णांची सख्या सर्वाधिक आहे.
भारताची स्थिती
भारतात एचआयव्ही ग्रस्त लोकांचनी संख्या सुमारे २४ लाख असल्याचा अंदाज आहे. पीएलएचआईव्हीची संख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे राज्य पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. सन २०२१ मध्ये भारतातील वार्षिक नवीन संसर्ग झाल्याची संख्या ६२.९७ हजार असल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा -