Bundi Ladoo Recipe: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेकांनी घराची साफसफाई केली असून आता फराळ तयार करण्याची लगबग सर्वांना असेल. चकली, चिवडा, शंकपाडे, करंजी आणि शेव सारखे फरळा आपण घरच्या घरी तयार करतो. परंतु मिठाई सहसा बाजारातूनच आणतो. मात्र, दिवाळीच्या या दिवसात भेसळयुक्त मिठाईनं बाजारं सजलेली असतात. अशात आता चिंता करू नका. कारण, आम्ही आज तुम्हाला हलवाईसारखे बुंदीचे लाडू तयार करण्याची पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घ्या बुंदीचे लाडू तयार करण्याची सोपी रेसिपी.
- साहित्य
- 500 ग्रम बेसन
- 1 लिटर पानी
- फूड कलर
- पाणी 2-3 कप
- केसर
- 50 ग्रॅम काजू
- 200 ग्रॅम तूप
- तळण्यासाठी तेल
- मगज बिया 1 किंवा 2 टीस्पून
- वेलची
- मनुका 50 ग्रॅम
- साखर 2 कप
- कृती
- सर्वप्रथम बेनस आणि पाणी घ्या. आता बेसनामध्ये गरजेनुसार पाणी घाला आणि मध्यम कंन्सिस्टंसीची पेस्ट तयार करा.
- आता तयार झालेल्या मिश्रणात केसरी फूड कलर घालून घ्या आणि मिश्रण पुन्हा एकजीवक करुन घ्या.
- एक कढई घ्या त्यात तेल घाला. तेल तापवून घ्या. तापलेल्या तेलावर झारा धरून त्यातवर मिश्रण ओता.
- बूंदी गरम तेलात 10 मिनिट मध्यम आचेवर तळून घ्या.
- एक पातलं घ्या त्यात साखर आणि पाणी घाला. मध्यम आचेवर साखरचा पाक तयार करा.
- तयार झालेल्या पाकामध्ये वेलची पूड घाला.
- आता साखर पाकामध्ये तळलेली बुंदी घाला तसंच त्यात मनुका, मगज बिया, काजू, घाला आणि मिश्रण 20 मिनिट झाकून ठेवा. मिश्रण झाकून ठेवल्यामुळे बुंदी नरम होईल.
- नरम झालेल्या बुंदीचे लहान-लहान लाडू बनवा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.)