Floor Cleaning Tips: दिवाळी एका दिवसावर येऊन ठेपली आहे. घरातील साफसफाई, फराळ आणि इतर काम झाली असणार.अशात फरशी पुसणे हे दररोजच काम आहे. सणासुदीच्या काळात फरशीवरून आपल्या घराच्या स्वच्छतेचा अंदाज येतो. त्यामुळे ती चकाकदार असावी असा सर्वांचा आग्रह असतो. परंतु फरशी वरील काही चिकट डाग निघत नाही. यामुळे अनेक महिला त्रस्त असतात. कितीही घासली किंवा रगडली तरी देखली फरशी काही केल्या नीट साफ होत नाही? अशावेळी फरशी पुसताना खाली दिलेल्या गोष्टी केल्यास फरशीवरील डाग तर दूर होणारचं शिवाय झुरळ, किटक आणि माश्यादेखील घराबाहेर पडतील.
- व्हिनेगार, खाण्याचा सोडा आणि डिशवॉश: सर्वप्रथम तुम्ही बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात एक चमचा व्हिनेगर, एक चमचा डिशवॉश आणि दोन चमचे खाण्याच्या सोडा मिसळा. या पाण्यानं घरातील संपूर्ण फरशी पुसून काढल्यास फरशीवरील काळे डाग निघून जातील. तसंच घरात लपून बसलेले झुरळ, माश्या आणि किटक देखील बाहेर पडतील.
- गरम पाणी: तेलाचा कॅन आणि सिलेंडरमुळे स्वयंपाक खोली काळी आणि तेलकट होते. अशा वेळी गरम पाण्यानं फरशी धुवून काढल्यास काळे डाग नाहीसे होतील. एका बादलीमध्ये गरम पाणी घ्या. गरम पाण्यात डिटर्जंट पावडर टाका. या पाण्यानं फरशी पुसून काढा, असं केल्यास फरशी नव्यासारखी चमकू लागेल.
- मीठ आणि बेकिंग सोडा: बादलीभर पाण्यात मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा. या पाण्यानं संपूर्ण घर पुसून काढा. यामुळे घरात किडे येणार नाही.
- ब्लिच: फरशी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्लिचचा वापर करु शकता. बादलीभर पाण्यात 1 झाकण ल्बिच आणि एक चमचा डिटर्जंट पावडर मिसळा. हे मिश्रण 10 मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर मिश्रण फरशीवर टाकून पसरवा. आता फरशी नीट पाण्यानं धुवून घ्या.