हैदराबाद- व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना मधुमेह होतो. मात्र, केवळ लघवीचे प्रमाण वाढणे हे मधुमेहाचे लक्षण आहे, असं मानलं जाते. प्रत्यक्षात तोंडातील लक्षणावरूनदेखील मधुमेहाचा धोका असल्याचे समजते.
कोरडे तोंड पडणे : तज्ञांच्या माहितीनुसार जर तुमचे तोंड सारखे कोरडे असेल तर ते मधुमेहाचं लक्षण आहे. कारण, रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असताना किडनीकडून पाण्याचा जास्त वापर होतो. त्यामुळे लघवी जास्त प्रमाणात बाहेर पडते. शरीरातून पाण्याचं कमी प्रमाण होत असल्यानं तोंड कोरडे पडते. 2019 मध्ये 'डायबेटिस केअर जर्नल' मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास तोंड कोरडणे पडणे आणि जास्त लघवीची लक्षणे दिसू लागतात. या संशोधनात सहभाग घेतलेल्या चीनच्या शांघाय शिओटोंग विद्यापीठातील डॉ. शिओबिन ली यांच्या माहितीनुसार मधुमेह असलेल्या लोकांमध्ये तोंड कोरडे पडणं हे सामान्य लक्षण आहे.
हिरड्यांचे आणि दातांचे आजार होणे: रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर तोंडात बॅक्टेरिया पसरतात. परिणामी, हिरड्यांचे आजारही होतात. त्यामुळे ब्रश करताना रक्तस्त्रावदेखील होऊ लागतो. हिरड्यांचे विकार होताना दात खराब होऊ शकतात. दातांची अत्यंत झीज होणे आणि दातांमध्ये पोकळी होणे, अशा समस्या उद्धभवतात. त्यामुळे दाते खिळखिळे होऊन गळण्याचं प्रमाण वाढते.
- तोंडातील लाळेमध्ये साखरेचे प्रमाण वाढणे : मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी हे एक लक्षण असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लाळेमध्ये साखरेची पातळी वाढल्यानं बॅक्टेरिया वाढू लागतात. त्याचा परिणामी म्हणून दातांमध्ये पोकळी आणि तोंडामध्ये संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
- श्वासाची दुर्गंधी वाढणे : जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या श्वासाला कुजलेल्या फळासारखा वास येतो. यामागे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होणे हे कारण असते. त्यामुळे मधुमेहाच्या निदानासाठी हे एक महत्त्वाचे लक्षण मानता येईल.
- तोंडात जखमा होणे : तज्ज्ञांच्या मते, मधुमेही रुग्णांमध्ये तोंडामध्ये जखमा होणे हे खूप सामान्य लक्षण आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित झाल्यानंतर या जखमा होतात.
सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा येणे आणि वजन कमी होणे यासारखी लक्षणेही मधुमेह रुग्णांमध्ये दिसून येतात, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे, तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन संबंधित चाचण्या कराव्यात.
(Disclaimer: येथे वाचकांना माहिती मिळावी, यासाठी आरोग्याची माहिती दिलेली आहे. ही माहिती वैज्ञानिक संशोधन, अभ्यास, वैद्यकीय आणि आरोग्य व्यावसायिक सल्ल्यांवर आधारित देत आहोत. परंतु, त्यांचे पालन करण्यापूर्वी किंवा कोणत्याही उपचारापूर्वी तुमच्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.)
हेही वाचा-