हैदराबाद Best Foods For diabetes - धावपळीचे जीवन, चुकीची जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे मधुमेही रुग्णांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहाराची आवश्यकता आहे. एकदा मधुमेह झाला की आयुष्यभर हा रोग रुग्णाची पाठ सोडत नाही. साखर वाढण्याच्या भीतीनं रुग्ण आहार कमी घेतो. कोणता आहारा घ्यावा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रमावस्था असते. मधुमेही लोकांनी कोणता आहार घ्यावा? कोणती काळजी घ्यावी? याबाबत माहिती घेऊया.
मधुमेहाची काय आहेत लक्षणे - अनेकांना बालपणापासून मधुमेह असतो. जर वेळीच त्याकडं लक्ष दिलं नाही तर दुसऱ्या रोगाची लागण होण्याची भीती असते. आहाराच्या चुकीच्या सवयी आणि ताण हे मधुमेहाचं खरं कारण असल्याचं डॉक्टर सांगतात. सारखं लघवीला जावं लागत असेल, खूप तहान लागणे, खूप भूक लागणे आणि पायाला सूज ही मधुमेहाची लक्षणं आहेत. मधुमेही रुग्णांनी तीन महिन्यांतून एकदा HPA1c टेस्ट करणं आवश्यक असतं. त्यामध्ये रिपोर्ट ३ ते ५.४ पातळीपर्यंत आल्यानंतर घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, जर ५.६ पातळी असले तर प्रीडायबटिक श्रेणीत तुम्ही आहात. जर रिपोर्टमधील पातळी ही ७ हून अधिक असेल तर तुम्हाला मधुमेह झाला आहे, असं मानण्यात येतं.
आहारात याचा करा समावेश - मधुमेह झाला असेल तर आहार काळजीपूर्वक घ्यायला हवा. संतुलित आहारामुळे मधुमेहावर नियंत्रण राहाते. रुग्णाला कोणत्याही स्थितीत शरीरातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे लागते. आहारात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. प्रथिनयुक्त आहाराच्या तुलनेत कार्बोहायड्रेट्स आहारातून साखरेचे शरीरामधील प्रमाण वाढते.
मधुमेहींना काय टाळावे - मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मिठाचे कमी सेवन करायला हवे. मांसाहार, दुधाचे पदार्थ, आईस्क्रीम, नारळाचे तेल आणि चिकनमध्ये स्निग्धतेचे (FAT) अधिक प्रमाण असते. मधुमेह असेल तर फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ टाळायला हवे. मधुमेही रुग्णांनी फायबर असलेली फळं, भाज्या, कडधान्य आहारात घेतलं पाहिजे. तर नाष्टा करताना उपमा, बोंडा, वडा आणि पुरी खाऊ नये. त्याऐवजी ओट्स आणि डाळीपासूनचे पदार्थ नाष्ट्यात घ्यायला हवेत. दुपारी ऋतुप्रमाणं उपलब्ध होणारी फळं खावीत. दुपारी भात कमी आणि पालेभाज्या जास्त खाव्यात. कधी-कधी बीटही आहारात घ्यावे. दिवसातून एकवेळ तरी डाळीचा आहारात समावेश करावा.
रात्री कधी जेवण करावे - मधुमेह असलेल्या रुग्णांनी चहा आणि कॉफी मर्यादित घ्यावी. रात्री ८ ते ८:३० वाजेपर्यंत जेवण करावे. त्यामुळे साखरेचं प्रमाण मर्यादित राहातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री जेवल्यानंतर २० मिनिटे फिरावे. दिवसभरात ७ ते ८ वेळा थोडे-थोडे खावे. नाष्टा करण्यात निष्काळजीपणा करू नये. नाष्ट्यात अंडी, कडधान्य, ब्रोकली आणि सॅलडचा समावेश करू शकता. मधुमेही रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )
हेही वाचा-