Coffee VS Green Tea: सध्या बहुसंख्येनं लोक आरोग्याबाबत जागरूक आहेत. निरामय जीवन जगण्यासाठी आहारासंबंधित विशेष काळजी लोकं घेतात. असं असतानाही हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये अनपेक्षित वाढ होत आहे. त्यावर उपाय म्हणून कॉफी आणि ग्रीन टीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी देखील ग्रीन टी तसंच शरीर आणि मूड सुधारण्यासाठी कॉफी पितात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, ग्रीन टी आणि कॉफी हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे?
- ग्रीन टी पिण्याचे आरोग्यदायी फायदे
- कोलेस्टेरॉलचे नियंत्रण: ग्रीन टी प्यायल्यानं एलडीएल (खराब कोलेस्टेरॉल) पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. हा हृदयाच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. कारण ग्रीन टीच्या नियमित सेवनानं रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारते. ग्रीन टीचे अँटिऑक्सिडेंट गुणधर्म हृदयाच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात आणि सूज कमी करतात तसंच हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे.
- रक्तदाब नियंत्रणास उपयुक्त: दररोज ग्रीन टी प्यायल्यानं रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हा एक नैसर्गिक उपाय आहे. जे हृदयाची क्रिया संतुलित करते. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात. ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो. ग्रीन टीच्या नियमित सेवनानं रक्तदाब कमी होण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते.
- दाहक विरोधी गुणधर्म: ग्रीन टीमधील दाहक-विरोधी घटक हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. हृदयाच्या आरोग्यासाठी ग्रीन टी उत्तम आहे. ग्रीन टीच्या नियमित सेवनामुळे रक्त प्रवाह सुधारतो.
- स्नायूंचे कार्य सुधारते: दररोज ग्रीन टी प्यायल्यानं रक्त प्रवाह सुरळीत होतो, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना चांगलं पोषण मिळते. यामुळे हृदय अधिक कार्यक्षमतेने कार्य करते. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत करतात. ज्यामुळे रक्त प्रवाह सुलभ होतो. चांगल्या रक्तप्रवाहामुळे हृदयाच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वं मिळतात म्हणूनच, ग्रीन टीचे नियमित सेवन हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी आणि स्नायूंचे कार्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी कॉफीचे फायदे
- कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आढळतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात हे हृदयविकारापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. कॉफी रक्तदाब वाढवू शकते. म्हणून सावधगिरीने पिनेच उत्तम कमी रक्तदाब असलेल्या लोकांसाठी कॉफी विशेषतः फायदेशीर ठरू शकते
- टाइप २ मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. या परिस्थितीत कॉफी फायदेशीर आहे, कारण ती चयापचय वाढवते.
- कॉफी चयापचय गतिमान करते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी निरोगी वजन देखील महत्त्वाचे आहे.
- नियमित कॉफीमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. कॅफिन आणि त्यातील इतर घटक हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC5871637/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)