ETV Bharat / health-and-lifestyle

हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बनवा गाजर आणि आल्याचा सूप - CARROT GINGER SOUP RECIPE

Carrot Ginger Soup Recipe: हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण विविध उपाय करतो. परंतु आम्ही सांगितलेलं सूप ट्राय केल्यास तुम्ही थंडीपासून स्वतःचा बचाव करू शकता.

Carrot Ginger Soup Recipe
गाजर आणि आल्याचा सूप (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Nov 14, 2024, 11:23 AM IST

Carrot Ginger Soup Recipe: हिवाळ्यात सर्दी, फ्लू होण्याची शक्यता जास्त असते. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणऱ्या सूपची रेसिपी घेऊन आलोय. यामुळे तुम्ही सर्दी आणि इतर संसर्गजन्य आजारापासून दूर राहू शकता.

हिवळ्यामध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम पेय फायदेशीर असतात. असाच एक पदार्थ आहे जो थंडीपासून तुमचं बचाव करू शकतो. तो पदार्थ म्हणजे सूप. हे केवळ स्वादिष्टच नसून आरोग्यासाठी उत्तम पेय आहे. आपण विविध प्रकारचे सूप तयार करतो. परंतु थंडीच्या दिवसांमध्ये गाजर आणि आल्यापासून तयार केलेलं सूप आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गाजर आणि आलं हे दोन्ही जीनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. गाजरात बीटा कॅरोटीन असते. तसंच गाजरामध्ये व्हिटॅमिन अ मुबलक प्रमाणात असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फादेशीर आहे. तसंच आल्यामध्ये जिंजरॉल असते. जे एक शक्तीशाली अँटीऑक्सिडेंट आहे.

तज्ञांच्या मते, गाजर आणि आलं दोन्ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण करते.

गाजर आणि आल्याचा सूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • ४-५ गाजर (किसलेले)
  • १ इंच आलं (चिरलेला)
  • 1 कांदा (चिरलेला)
  • 2-3 लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
  • 1 टीस्पून तेल
  • 1/2 टीस्पून जिरे
  • 1/4 टीस्पून हळद पावडर
  • 1/2 टीस्पून धने पावडर
  • 1/4 टीस्पून लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • 4 कप पाणी
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

  • सर्वप्रथम एक कढई घ्या. त्यात तेल गरम करा. गरम तेलामध्ये जिरं टाका. नतंर कांदा आणि लसून घाला आणि लालसर होईपर्यंत परता.
  • आता यात किसलेले गाजर आणि आलं घालून 2-3 मिनिटं परतून घ्या.
  • या मिश्रणात हळद, धनेपूड, मिरची पावडर, आणि मीठ घालून चांगलं मिक्स करा.
  • आता एका पातील्यात 4 कप पाणी घाला आणि बॉईल होवू द्या.
  • यात तयार केलेल गाजर आणि आल्याचं मिश्रण घाला. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर उकळू द्या.
  • नंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. आता हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून गुळगुळीत करुन घ्या.
  • पॅनमध्ये थोडं लोणी आणि मिरेपुड कोथिंबीर घालून गरम सर्व करा.
  • या सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या घालू शकता.
  • जर तुम्हाला सूप मलाईदार बनवायचं असेल तर त्यात थोडे क्रीम किंवा दूध घालू शकता.

गाजर आणि आलं सूप पिण्याचे फायदे

  • पोषणतज्ञांच्या मते, आल्यामध्ये टी-ऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
  • आलं पचनक्रिया सुधारण्यास मदत करते तसंच गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर करते.
  • गाजरात व्हिटॅमिन अ असते. जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
  • गाजरामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी देखील चांगलं आहे.
  • या सूपमध्ये कॅलरीज कमी असल्यानं वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.

संदर्भ

https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK92775/

https://www.health.harvard.edu/staying-healthy/the-pros-and-cons-of-root-vegetables

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. घर-बसल्या अशाप्रकारे तपासा रोगप्रतिकारक शक्ती
  2. वजन कमी करण्यासाठी नव्हे तर मधुमेहावरही फायदेशीर आहेत रताळे
  3. सकाळी अंथरुणातून उठताच या '6' गोष्टी अवश्य करा, बर्फासारखं वितळेल कोलेस्ट्रॉल
  4. हृदयविकार टाळू शकतो 'ABCDEF' फॉर्म्युला; एकदा वापरून पहाच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.