हैदराबाद Can Diabetic Drink Milk: खराब जीवनशैलीमुळे मनुष्य अनेक आजारांना आमंत्रण देतो. हृदविकार, बद्धकोष्ठ, रक्तदाब, किडनीस्टोन सोबत मधुमेहाचादेखील समावेश आहे. व्यायामाचा अभाव आणि सकस अन्न न घेतल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकट्या भारताचा विचार केला तर जवळपास 7.7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आढळतील. विशेष बाब म्हणजे कमी वयातील लोक सुद्धा मधुमेहाच्या विळख्यात अडकत आहेत. यामुळे आहार घेताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषतः काही पदार्थ आणि पेय खाऊ नयेत, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अनेक मधुमेहींना शंका असते की, ते दूध पिऊ शकत नाहीत.
मधुमेह असलेल्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल आणि खाण्याच्या सवयींबद्दल खूप काळजी घेतली पाहिजे. अन्यथा, रक्तातील साखरेची पातळी वाढून गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्व मिळावे म्हणून बऱ्याच लोकांसाठी दूध हे पूर्ण अन्न आहे असा समज आहे. काही प्रमाणात हे खरंसुद्धा आहे. कारण दुधामध्ये असलेले कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु मधुमेहग्रस्तांनी दुधाचं सेवन करताना विशेष काळजी घ्यावी, असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
मधुमेह असलेले लोक केळी खाऊ शकतात का? तज्ज्ञ काय म्हणतात?
- संशोधनानुसार, दुधामुळे मधुमेह होतो किंवा समस्या वाढतात याचा कोणताही पुरावा नाही. तज्ज्ञांचे मते मधुमेह असलेल्यांनी जास्त फॅट असलेल्या दुधापासून शक्य तितकं दूर राहावं. कारण जास्त फॅट सेवन केल्यानं मधुमेहींमध्ये काही समस्या होऊ शकते. मधुमेही रुग्णांनी हाय फॅट दुधाऐवजी 'लो फॅट' दूध घेणं चांगलं आहे.
"अमेरिकन सोसायटी फॉर न्यूट्रिशन" या जर्नलमध्ये प्रकाशित 2019 च्या अभ्यासात असं आढळून आलं की कमी फॅट असलेलं दूध टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करू शकते. स्पेनमधील कॅस्टिला-ला मंचा विद्यापीठातील डॉ. सेलिया अल्वारेझ ब्युनोनं हे संशोधन केलंय.
संतुलित आहार घेणं फार महत्वाचं-तज्ज्ञांचे मते, प्रथिने आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेले दूध मधुमेहींसाठी खूप उपयुक्त आहे. कारण दुधात प्रथिने भरपूर असतात. तसंच त्यात शरीसाठी अत्यावश्यक असलेलं अमिनो ॲसिड देखील असतं. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. जास्त दूध घेणंदेखील चांगलं नाही. तसंच जास्त मद्यपान केल्यानं दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विशेषत: मधुमेह असलेल्या लोकांसाठी, कमी फॅट आणि फायबरचे प्रमाण जास्त असलेला संतुलित आहार घेणं फार महत्वाचं आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )