सिडनी 6 Fours in An Over : एकीकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना सुरु असताना त्याचवेळी आणखी एक सामना सुरु होता आणि त्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजानं नवा पराक्रम केला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसोबत ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बीबीएल सुरु आहे आणि त्यात बेन डॉकेटनं एकाच षटकात प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी खराब केला. इतकंच नाही तर यंदाच्या बिग बॅश लीगमधील सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर केला.
Six fours in the one over!
— KFC Big Bash League (@BBL) December 26, 2024
Ben Duckett is going off at the SCG - hitting Akeal Hosein for six fours in a row. #BBL14 pic.twitter.com/U0mZ9VjiSS
BBL मध्ये सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना : आज बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात सिडनी सिक्सर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना चांगला चालला असला तरी चौथ्या षटकात काहीतरी आश्चर्यकारक घडलं. सिडनी सिक्सर्स अकील हुसेन गोलंदाजीला आला. बेन डॉकेटनं पहिला चेंडू सीमारेषेबाहेर पाठवून चौकार मारला. यानंतर डॉकेटनं दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरही असंच काहीसं केलं. यानंतरही तो थांबला नाही आणि एकामागून एक सहा चेंडूंवर सहा चौकार मारले. यापूर्वी अनेक फलंदाजांनी हे काम केलं असलं तरी अलीकडच्या काळात हे प्रथमच घडलं आहे.
Sent!
— KFC Big Bash League (@BBL) December 26, 2024
Welcome to the crease, @Gmaxi_32 🔥 #BBL14 pic.twitter.com/ynGVcVfkov
पॉवरप्लेमध्ये या वर्षातील सर्वोच्च धावा : मेलबर्न स्टार्सच्या तीन षटकांअखेर 33 धावा असलेली धावसंख्या चौथ्या षटकानंतर अचानक 57 पर्यंत पोहोचली. बीबीएलमधील हा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर आहे. विशेष म्हणजे BBL मध्ये, पहिला पॉवरप्ले फक्त चार षटकांचा असतो, त्यानंतर, उर्वरित दोन षटकांचा पॉवरप्ले 10 षटकांनंतर संघ कधीही घेऊ शकतो.
Six fours in the one over!
— KFC Big Bash League (@BBL) December 26, 2024
Ben Duckett is going off at the SCG - hitting Akeal Hosein for six fours in a row. #BBL14 pic.twitter.com/U0mZ9VjiSS
डॉकेटची शानदार खेळी : यानंतरही बेन डॉकेटनं आपली खेळी सुरु ठेवत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. बाद होण्यापूर्वी डॉकेटनं 29 चेंडूत 68 धावा केल्या. या कालावधीत त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. संघानं 10 षटकांपूर्वीच 100 धावांचा टप्पा सहज पार केला आणि 20 षटकांत मोठी धावसंख्या उभारली. मात्र सामना जिंकण्यात त्यांना अपयश आलं. जेम्स व्हिन्सच्या खेळीच्या बळावर सिडनी सिक्सर्सनं हा सामना 8 विकेटनं आरामात जिंकला.
हेही वाचा :