Health Benefits Of Betel Leaf : विड्याची पानं अनेक शतकांपासून भारतीय संस्कृतीचा भाग आहेत. या छोट्या पण पराक्रमी पानानं कोट्यवधी भारतीयांची मनंच नाही तर अभिरुचीही जिंकली आहे. लग्नापासून ते सणांपर्यंत, पान हा प्रत्येक उत्सवाचा अविभाज्य घटक आहे. फुल आणि फळांसोबतच विड्याची पानं पुजा तसचं शुभकार्यात वापरली जाता. तसंच जेवणानंतर पान खानं अनेकांच्या सवयीचा भाग आहे. दुसरीकडे आयुर्वेदामध्ये विड्याच्या पानांचा उपयोग औषध म्हणून केला जातो. विड्याच्या पानांमुळे अनेक आरोग्य विषयक समस्या दूर होवू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.

100 ग्रॅम विड्याच्या पानांमध्ये 1.3 मायक्रोग्राम आयोडीन, 4.6 मायक्रोग्राम पोटॅशियम, 1.9 मोल किंवा 2.9 एमसीजी व्हिटॅमिन ए, 13 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी1 आणि 0.63 ते 0.89 मायक्रोग्राम निकोटिनिक अॅसिड असते. तसंच प्रोपन, फिनाइल, टॅनिन, अल्कलॉइड्स सारखे पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत.

- मधुमेहाच्या रुग्णांनी टाळावं: ''डॉ. मनीषा काळे यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी बाजारात उपलब्ध असलेले विड्याचं पानं टाळावे. कारण आपण बाजारात जे पान खातो त्यात सुपारी असते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनात असं म्हटलं आहे की, सुपारीमध्ये असलेले अरेकोलीन इन्सुलिन सेंसिटीव्हीटी कमी करते. यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. तसंच टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेहाच्या रुग्णांना पान खायचं असेल तर त्यांनी सुपारी, तंबाखू आणि मीठा पान टाळावं.''
- मौखिक आरोग्य: विड्याची पानं चघळल्यानं श्वासाची दुर्गंधी आणि हॅलिटोसिस दूर होते. तसंच दातदुखी, हिरड्या दुखणे, सूज आणि तोंडाच्या संसर्गापासून देखील आराम मिळतो.
- श्वासोच्छवासाच्या समस्यांवर उपचार करते: छाती, फुफ्फुसातील रक्तसंचय, ब्राँकायटिस आणि दमा यासारख्या समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी हा एक उत्कृष्ट उपचार आहे.
- पचनासाठी उत्तम: विड्याच्या पानांचा वापर पचनक्रिया सुधारण्यासाठी केला जातो. चयापचय सुरळीत करण्यासाठी ते उपयुक्त आहेत. विड्याच्या पानातील जीवनसत्त्व आणि पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी शरीर आतड्यांना उत्तेजित करतं.
- मूड सुधारतो: विड्याच्या पानांमध्ये सुगंधी फिनोलिक संयुगे असल्यामुळे मूड सुधारतो.
- सूक्ष्मजीव विरोधी गुणधर्म: विड्याची पानं एक उत्कृष्ट वेदनाशामक आहे. त्यात सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म आहेत. कापलेली जागा, जखम आणि पुरळ यामुळे होणारी वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
- त्वचेचे आरोग्य: विड्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. विड्याच्या पानांचा फेस पॅक त्वचेवरील काळे डाग दूर करू शकतात.
- कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात: विड्याच्या पानामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
- कर्करोगाचा धोका कमी: विड्याच्या पानांमध्ये आढळणाऱ्या अँटी कॅन्सर तत्वामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
संदर्भ
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3892533/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)