ETV Bharat / health-and-lifestyle

मधुमेहाचे रुग्ण काळे चणे खाऊ शकतात का? - DIABETES CONTROL TIPS

मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळे चणे खूप फायदेशीर असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. परंतु, अनेक लोक खाण्याची योग्य पद्धत अवलंब करत नसल्यामुळे त्यांना फायदा होत नाही.

Diabetes Control Tips
काळे चणे (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Nov 21, 2024, 7:44 PM IST

Diabetes Control Tips : जगभरात असंख्य लोक मधुमेहासारख्या जीवघेण्या आजारानं ग्रस्त आहेत. मधुमेह हा एक असा आजार आहे, जो आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. याला असाध्य रोग असेही म्हणता येईल. परंतु जर तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केले तर तुम्ही मधुमेह नियंत्रित ठेवू शकता. भारतात मधुमेह ग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे असं एका संशोधनातून स्पष्ट झालं. मधुमेही रूग्णांना ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला नेहमी डॉक्टर देतात. कारण कमी ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात.

  • काळ्या चण्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स: नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, काळ्या चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. अशा वेळी जेव्हा तुम्ही काळ्या चण्याचं सेवन करता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप हळू वाढते. हे काळ्या चण्याच्या कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे होते. जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढवतात तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ हळूहळू वाढवतात. त्यामुळे तज्ञ, मधुमेह ग्रस्ताना कमी इंडेक्स असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.
  • ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, Glycemic Index (GI) अन्न खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेच्या पातळीवर काय परिणाम होतो. कार्बोहायड्रेट-समृद्ध अन्नपदार्थांची क्रमवारी लावण्याचा हा एक मार्ग आहे. ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट्सचा प्रकार आणि प्रमाण, तसंच अन्न तयार करणे आणि इतर घटकांवर अवलंबून असतो.
  • मधुमेह ग्रस्त काळे चणे खाऊ शकतात का? काळे चणे हे मधुमेहींसाठी एक चांगला आहार पर्याय असू शकतात, कारण त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी हळूहळू आणि स्थिर ठेवण्यास हे उपयुक्त आहेत. परंतु आपल्या आहारात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ञांशी सल्लामसलत करणे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येकाच्या पोषणविषयक गरजा वेगवेगळ्या असतात. जे एका व्यक्तीसाठी कार्य करते ते दुसऱ्यासाठी देखील कार्य करू शकत नाही.
  • काळे चणे खाण्याचे फायदे : काळ्या हरभऱ्यामध्ये आवश्यक पोषक घटक असतात. काळा हरभरा हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो स्नायूंच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, त्यात फायबर असते. जे पचन करण्यास मदत करते आणि निरोगी रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. काळ्या चणामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील समृद्ध असतात, जे संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी योगदान देतात.
  • चणे खाल्ल्याने इतर आजार बरे होतात?
  • पोटासाठी फायदेशीर : चणे खाल्ल्यानं पचनक्रिया व्यवस्थित होते. अंकुरलेले चणे खाल्ल्यानं बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते. याशिवाय ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास चणे फायदेशीर आहेत. अंकुरलेले चणे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात.
  • वजन कमी करण्यास मदत करते: अंकुरलेले चणे देखील वजन कमी करण्यास मदत करतात. या चण्यांमध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर खनिजे हाडं मजबूत करतात. अंकुरलेले चणे खाल्ल्यानं सांधेदुखीपासून आराम मिळतो. काळ्या हरभऱ्यामध्ये असलेले आयर्न शरीरातील ॲनिमियासारख्या आजारांपासून बचाव करते आणि तुम्हाला पूर्णपणे निरोगी ठेवते.
  • कसं सेवन करावं? काळ्या हरभऱ्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. काळे चणे उकळून, भिजवून, भाजी, चाट आणि कोशिंबीर म्हणून वापरता येतात. ते खाण्याचा सर्वात सोपा आणि योग्य मार्ग म्हणजे चाट बनवून खा. टोमॅटो, कांदा, काकडी, धणे आणि हिरवी मिरचीचे छोटे तुकडे करा. नंतर एका भांड्यात उकडलेले चणे घा. आता काटलेले सर्वघटक त्यात घाला आणि चांगलं मिसळा. नंतर त्यावर लिंबू पिळून त्यात चवीनुसार मीठ टाकून खावं.

संदर्भ

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/2272678/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. भिजलेले मनुके आणि त्याचं पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे; वजनासोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
  2. उपाशी पोटी लसूण खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; तणावासह रक्तदाब नियंत्रित
  3. आरोग्यवर्धक आहे पाया सूप; सांधेदुखी आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम
  4. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.