ETV Bharat / health-and-lifestyle

हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी बीट फायदेशीर; जाणून घ्या बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बीटरूट नियमित सेवन केल्यास हृदयविकार, रक्तदाब, अशक्तपणा आदी आरोग्यविषयक समस्या दूर होतात. वाचा सविस्तर..

Health Benefits Of Beetroot
बीटरूट खाण्याचे फायदे (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : 2 hours ago

Health Benefits Of Beetroot: बीट खाण्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. बीटचा गडद लाल रंग पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. तुम्ही ते सॅलड म्हणून खावू शकता किंवा ज्यूस बनवून पिऊ शकता. बीट सर्व प्रकारात फायदेशीर आहे. बीटरूट लोह, पोटॅशियम, फायबर, अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. बीटरूटचे नियमित सेवन केल्यानं त्वचा चमकदार राहते आणि हृदय, यकृत आणि मेंदू निरोगी राहते. यामुळे शरीरातील तग धरण्याची क्षमता वाढते, रोप्रतिकारशक्ती सुधारते आणि तसंच इतर अनेक घातक आजारांपासून बचाव होतो.

मुंबईतील अन्न आणि पोषण तज्ञ रुशेल जॉर्ज यांच्या मते, बीट खाल्ल्याने रक्तदाब, अशक्तपणा आणि हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. हे नायट्रेट्सनं समृद्ध आहे, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते आणि रक्त परिसंचरण सुधारते. याशिवाय बीटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. विशेषतः खेळाडूंसाठी हे जास्त फायदेशीर आहे. कारण यामुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

  • बीट्समधील पोषण घटक
  • लोह: बीटरूट लोहाचा एक चांगला स्रोत आहे. ज्यामुळे शरीरात रक्त परिसंचरण सुधारते.
  • फोलेट: हे पोषक पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. विशेषतः गर्भवती महिलांसाठी हे फायदेशीर आहे.
  • पोटॅशियम: हे हृदयाची गती नियंत्रित करते आणि स्नायू मजबूत करते.
  • फायबर: निरोगी पाचन तंत्र राखण्यास आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करते.
  • व्हिटॅमिन सी: रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि त्वचा चमकदार बनवते.
  • अँटिऑक्सिडेंट (बेटालिन): हे बीटला त्यांचा खोल लाल रंग देते आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.
  • बीट खाण्याचे फायदे
    रक्तदाब नियंत्रित राहते. तसंच हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • यामध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीरात रक्त प्रवाह वाढतो आणि ॲनिमियापासून बचाव होतो.
  • बीटमध्ये बीटालेन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. कर्करोग आणि इतर आजारांपासून बचाव करण्यास मदत करते.
  • शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी बीट चांगलं आहे. यकृत आणि मूत्रपिंड निरोगी असतात.
  • बीटमधील फायबर पचनास मदत करते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • बीटचा रस स्टॅमिना वाढवण्यास आणि थकवा कमी करण्यास मदत करतो.
  • यातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी त्वचा चमकदार आणि केस मजबूत करतात.
  • बीट नियमितपणे खाल्ल्यानं मेंदूचे कार्य योग्यरित्या चालते आणि स्मरणशक्ती सुधारते.
  • बीट कोणी खाऊ नये: मधुमेह, किडनी स्टोन आणि कमी रक्तदाब असलेल्यांनी बीटचे नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे, याच्या जास्त सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी ते नियमित घेऊ नये. त्यात ऑक्सॅलेट्स देखील असतात, ज्यामुळे स्टोन रूग्णांची समस्या वाढू शकते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. उपाशी पोटी लसूण खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; तणावासह रक्तदाब नियंत्रित
  2. वजन कमी करण्यासाठी नव्हे तर मधुमेहावरही फायदेशीर आहेत रताळे
  3. मधुमेह आणि हृदयाचे आजार टाळण्यासाठी 'या' हिरव्या भाजीचा आहारात करा समावेश
  4. सकाळी अंथरुणातून उठताच या '6' गोष्टी अवश्य करा, बर्फासारखं वितळेल कोलेस्ट्रॉल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.