ETV Bharat / sports

पाकिस्तानमध्ये खेळाडूंच्या हॉटेलला भीषण आग, थोडक्यात बचावले क्रिकेटपटू; मोठी स्पर्धा रद्द

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्णपणे आपल्या देशात आयोजित करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. याचं आयोजन करण्याच्या त्याच्या क्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Fire in Team Hotel in Pakistan
पाकिस्तान क्रिकेट संघ (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : 3 hours ago

इस्लामाबाद Fire in Team Hotel in Pakistan : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्णपणे आपल्या देशात आयोजित करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. सध्या, त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा भारतीय संघ आहे कारण भारत सरकारनं आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेचं कारण देत संघ पाकिस्तानला पाठविण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान सातत्यानं उच्चस्तरीय सुरक्षा पुरवण्याचा दावा करत असताना आणि आयसीसीपासून बीसीसीआयपर्यंत सर्वांनाच धमकावत असताना, या कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या त्याच्या क्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच, पाकिस्तानी बोर्डाला स्वतःची एक स्पर्धा रद्द करावी लागली कारण खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये भीषण आग लागली होती.

थोडक्यात बचावले खेळाडू स्पर्धा रद्द : पीसीबीनं दिलेल्या निवेदनानुसार, पाकिस्तानी बोर्डाला अचानक राष्ट्रीय महिला चॅम्पियनशिप 2024-25 ही देशांतर्गत महिला स्पर्धा अचानक रद्द करावी लागली. कराची येथील नॅशनल स्टेडियमवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पाच संघ सहभागी झाले होते. पीसीबीनं या सर्व संघातील खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी हॉटेलचा एक मजला पूर्णपणे बुक केला होता. याच मजल्यावर अचानक आग लागली, त्यामुळं सर्वजण घाबरले. यावेळी हॉटेलमधील 5 खेळाडू आपापल्या खोलीत होते मात्र ते कसेतरी बचावले.

स्पर्धा करावी लागली रद्द : प्राप्त वृत्तानुसार, घटनेच्या वेळी कराची स्टेडियममध्ये बहुतांश खेळाडू आणि अधिकारी उपस्थित होते, त्यापैकी काही सामने खेळत होते तर काही नेटमध्ये सराव करत होते. यावेळी हॉटेलमध्ये फक्त 5 खेळाडू होते, त्यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली. पीसीबीच्या म्हणण्यानुसार, काही खेळाडूंच्या सामानावर त्याचा परिणाम नक्कीच झाला. त्यामुळं बोर्डाला ही स्पर्धा मध्यंतरी रद्द करावी लागली कारण सध्या कराचीतील कोणत्याही हॉटेलमध्ये 100 खोल्या मिळत नाहीत, त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.

अशा प्रकारे पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करणार? : या अपघातामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाच्या पाकिस्तानच्या क्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघांनी भाग घ्यायचा आहे, त्यापैकी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही पण उर्वरित संघांना त्यांचे सामने तिथं खेळायचे आहेत. या स्पर्धेसाठी कराचीसह तीन पाकिस्तानी स्टेडियमची पुनर्बांधणी केली जात आहे, पण त्यालाही बराच वेळ लागेल. या सगळ्यामध्ये ही घटना पीसीबीसाठी अडचणी निर्माण करणारी आहे.

हेही वाचा :

  1. सौदी अरेबियात खेळाडूंवर 641 कोटी रुपयांची होणार उधळपट्टी; आतापर्यंत IPL लिलावात किती रुपये झाले खर्च?
  2. श्रीलंकेनं 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'हे' घडलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.