ETV Bharat / health-and-lifestyle

मधुमेह आणि हृदयाचे आजार टाळण्यासाठी 'या' हिरव्या भाजीचा आहारात करा समावेश

आपल्या एकूण आहारावर आपलं आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे निरोगी जीवन जगण्याकरिता आहारात पोषक घटकांचा समावेश करणे गरजेचं आहे.

Benefits Of Broccoli
ब्रोकोली (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Nov 12, 2024, 3:16 PM IST

Benefits Of Broccoli: ब्रोकोली ही एक क्रूसीफरेस वर्गीय भाजी आहे. जी अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. शरीराच्या एकूण आरोग्यासाठी ब्रोकोली अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ब्रोकोलीचा वापर सॅलडसह विविध भाज्या बनवण्यासाठी केला जातो. त्यामध्ये असलेले फायटोकेमिकल्स विषारी पदार्थ काढून टाकणारे एन्झाइम सक्रिय करून शरीराला डिटॉक्सिफाय करण्यात मदत करतात. त्याचप्रमाणे, ब्रोकोलीमध्ये विविध पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत.

ब्रोकोलीमध्ये असलेले पोषक घटक: ब्रोकोलीमध्ये क्वेर्सेटिन, पॉलीफेनॉल, ग्लुकोसाइड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे आपलं एकूण आरोग्य सुधारते. तसंच ब्रोकोलीमध्ये सेलेनियम, व्हिटॅमिन बी, फायबर आणि फॉस्फरस देखील आढळतात. यामुळे मधुमेहासह रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ब्रोकील उपयुक्त आहे.

  • ब्रोकोली खाण्याचे फायदे
  • हृदयाचे आरोग्य सुधारते: ब्रोकोलीमधील उच्च फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास तसंच उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणं हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. यामुळे ब्रोकोलीच्या नियमित सेवनामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
  • दाहक-विरोधी गुणधर्म: पोषणतज्ञांच्या मते, ब्रोकोलीमध्ये आढळणारे बायोएक्टिव्ह घटक दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. जे शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे संधिवात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • अँटिऑक्सिडंट्स समृद्ध: ब्रोकोलीमध्ये बीटा-कॅरोटीन, सल्फोराफेन, ग्लुकोराफेनिन यांसारखे महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करते. यामुळे हृदयविकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
  • डोळ्यांसाठी फायदेशीर: ब्रोकोलीमध्ये आढळणारे ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे पोषक तत्व दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात. हे मोतीबिंदू आणि वया संबंधित आरोग्य समस्या कमी करते.
  • त्वचेसाठी फायदेशीर: ब्रोकोलीमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करतात, असं तज्ञ म्हणतात. त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. कोलेजन सुरकुत्या प्रतिबंधित करते.
  • हाडे मजबूत होतात: ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. ब्रोकलीच्या नियमित सेवनाने ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. NIH च्या मते, ब्रोकोली कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. हाडे मजबूत करण्यासाठी आणि ऑस्टियोपोरोसिस रोखण्यासाठी आवश्यक आहे. यामध्ये व्हिटॅमिन के असते. जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10376324/#:~:text=Broccoli%20is%20a%20good%20calcium,a%20healthy%20metabolism%20%5B21%5D.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. किडनी स्टोनच्या समस्येनं त्रस्त आहात? जाणून घ्या या काय खावं आणि काय खाऊ नये
  2. शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात
  3. काय आहे 'रेनबो डाएट'; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.