हैदराबाद Brain Cancer : प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. मोबाइल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होत चालला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाकडं मोबाइल आहे. मोबाइल फोनच्या अति वापरामुळे कर्करोग होवू शकतो का? या विषयावर अनेक संशोधन सुरु आहेत. अनेकांना याबद्दल गैरसमज देखील आहे. परंतु याबद्दल ठोस माहिती नाही. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं की, मोबाइल फोनमधील रेडिओलहरींमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. परंतु जागिक आरोग्य संघटनेनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात या गैरसमजांना नकार दिलाय.
WHO अभ्यास काय म्हणतो? ऑस्ट्रेलियन रेडिएशन प्रोटेक्शन अँड न्यूक्लियर सेफ्टी एजन्सी (ARPANSA) द्वारे संशोधन करण्यात आला. एजन्सीनं विस्तृत अभ्यासानंतर निष्कर्ष काढला की, मोबाइल फोन आणि मेंदूचा कर्करोग यांच्यात कोणताही संबंध नाही. फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कर्करोग होतो हे पूर्णपणे निराधार आहे. मोबाइलमधील रेडिओलहरींमुळे मेंदूचा कर्करोग होण्याशी काहीही संबंधन नाही. जवळपास 5,000 अभ्यासांचं विश्लेषण करून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे.
हा मागील IARC अभ्यास काय म्हणतो? मे 2011 मध्ये, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने एक अभ्यास प्रकाशित केला. रेडिओ लहरींच्या संपर्कात आल्यानं कर्करोग होण्याची शक्यता असल्याच यात सांगण्यात आलं. ब्रेन कॅन्सरचे कारण असलेल्या ग्लिओमा ट्यूमर वायरलेस फोनच्या वापरामुळे होऊ शकतात, असंही सांगण्यात आलं. परंतु या संशोधनातील पुरावे मर्यादित होते. हा अभ्यास मर्यादित डेटासह प्रकाशित करण्यात आला.
रेडिओ लहरी आरोग्यासाठी हानिकारक नाहीत: अलीकडील संशोधनात, ARPANSA मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण केले. यामध्ये अलीकडील सर्व अभ्यास विचारात घेण्यात आले आणि अभ्यास करण्यात आलं. त्यानंतर वायरलेस तंत्रज्ञानाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ लहरी मानवी आरोग्यासाठी हानिकारक नसल्याचं स्पष्ट करण्यात झालं.
ARPANSA संशोधकांनी असा निष्कर्ष काढला, की मोबाइल फोनद्वारे उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ लहरींमुळे ग्लिओमा ट्यूमर, मेंदूचा कर्करोग आणि मेंदूशी संबंधित इतर कर्करोग होण्याची शक्यता नाही. एन्व्हॉयरमेन्टल इंटरनॅशनल जर्नलमध्ये हा लेख प्रकाशित झाला आहे.