Healthy Tips For Eye: दिवसभर स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहिल्यानं डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे दृष्टी गमावण्याचा धोका देखील वाढला आहे. ही समस्या केवळ प्रौढ किंवा वृद्धांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही दिसून येते. परिणामी सर्वांना नीट दिसण्यासाठी चष्मा लावावा लागतो. दृष्टी कमी होण्यामागे आहारासह इतरही अनेक कारणं असू शकतात. आवश्यक पोषक घटकांचा आहारात समावेश केला नाही तर डोळे हळूहळू कमजोर होऊ लागतात.
नेत्ररोग तज्ञांच्या मते, डोळे निरोगी ठेवण्यासाठी स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे. त्याचबरोबर आहाराची काळजी देखील घेणे देखील गरजेचं आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन अ आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले पदार्थ खावेत जाणून घ्या काही फळं आणि भाज्या ज्या तुमची दृष्टी सुधारण्यास मदत करू शकतात.
- डोळे निरोगी ठेवण्यासाठी काय खावे? गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन अ भरपूर प्रमाणात असतात. जे डोळ्याच्या रेटिनाला मजबूत करते आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्यामुळे सॅलड इत्यादीद्वारे गाजराचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.
- पालक: ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या अँटिऑक्सिडंट्सनं समृद्ध पालक डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करून दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करते. पालक शरीराच्या इतर भागांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे नियमित पालक खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
- रताळे: रताळे बीटा-कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे. जे डोळ्यांना वृद्धत्वाच्या समस्यांपासून वाचवते आणि त्यांना निरोगी ठेवते. त्यामुळे रताळ्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
- टोमॅटो: लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी असते. जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते.
- शिमला मिरची: यामध्ये व्हिटॅमिन अ आणि सी भरपूर प्रमाणात असते. हे डोळ्याचे स्नायू मजबूत करते आणि डोळ्यांचा थकवा कमी करते.
- केळी: केळी पोटॅशियम आणि व्हिटॅमिन अ ने समृद्ध असतात. यामुळे डोळे हायड्रेट राहतात आणि दृष्टी सुधारते. परिणामी डोळ्यांचा दाब आणि कोरड्या डोळ्यांच्या समस्या कमी होतात.
- ब्लूबेरी: यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवण्याचे कार्य करतात. यामुळे दृष्टी सुधारते.
- पेरू: अ आणि क जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेला पेरू डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करते.
- ब्रोकोली: ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. ब्रोकोलीच्या नियमित सेवनाने मोतीबिंदू टाळण्यास मदत होते.
- संत्री: व्हिटॅमिन सी समृद्ध, संत्री डोळ्यांच्या मज्जातंतू निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे दृष्टी सुधारते.
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6771137/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)