ETV Bharat / health-and-lifestyle

अपराजिता फुलाचे आयुर्वेदात विषेश महत्त्व, जाणून घ्या फायदे - Aprajita flower

Aparajita Flower Benefits : अपराजिता फुले अनेकदा आपल्या वेगवेळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. या फुलाचे आयुर्वेदात विशेष महत्व आहे.

Aparajita Flower Benefits
अपराजिता फुलाचे फायदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 3:12 PM IST

Updated : Mar 27, 2024, 3:57 PM IST

मुंबई - Aparajita Flower Benefits : निळ्या रंगाची अपराजिताची फुले ही दिसायला खूप आकर्षक असतात. या फुलाला आयुर्वेदात गोकर्णी, विष्णुक्रांता अशा नावांनी ओळखले जाते. अपराजिता फूलाचे आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. या फुलांचा उपयोग वेगवेगळ्या आजारावर केल्या जातो. अपराजिता फूल अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे. हे फुल इम्युनिटी बूस्टर आणि आरोग्यदायी आहे. वैद्य अरविंद वावरकर यांच्या मते ''अपराजिता फूलांचा चहा पिल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. हे फुल मधुमेहावर रामबाण उपाय आहे. याशिवाय पचनक्रिया देखील सुधारते. या फुलांमुळे अनेक आजारांपासून आराम मिळतो.'' चला जाणून घेऊया अपराजिता फुलाचे आरोग्यदायी फायदे.

Aparajita Flower Benefits
अपराजिता फुलाचे फायदे

अपराजिताचे फायदे : जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होत असेल आणि वजन कमी करायचे असेल तर अपराजिता फुलांचा चहा पिल्यानं तुमचे वजन कमी होते. ही चहा प्यायल्यानं चयापचय क्रिया वाढते आणि चरबी जाळण्यास मदत करते. हा चहा नियमित पिल्यानं झपाट्यानं वजन कमी होऊ शकते. अपराजिताच्या फुलांचे सेवन केल्यानं कर्करोगाचा धोका कमी होतो. या फुलामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात. अपराजिता फुले रक्तदाब आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. या फुलाच्या सेवनामुळे पचनसंस्था निरोगी राहते. याशिवाय अपराजिता त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.

शरीरासाठी उपयुक्त : अपराजिताच्या फुलाचे दररोज सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, त्यामुळे बीपी नियंत्रित राहते. याशिवाय हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. तसेच अपराजिताच्या चहामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात. हे शरीरातील इन्सुलिन स्पाइक रोखण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची समस्या उद्भवत नाही. हा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय अपराजिता चहा वृद्धत्वाच्या समस्येवर मात करू शकते. चेहऱ्यावर सुरकुत्या कमी करण्यासाठी हा चहा उपयुक्त आहे. निद्रानाशाचा त्रास होत असेल तर अपराजिताच्या फुलांचा चहा फायदेशीर ठरू शकतो.

Aparajita Flower Benefits
अपराजिता फुलाचे फायदे

अपराजिता फुलापासून चहा कसा बनतो? : हा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात 1 कप पाणी घ्या. या याला उकळी आल्यावर त्यात 4 ते 5 अपराजिताची फुले घाला. यानंतर हा चहा नीट उकळू द्या. यानंतर एका कपमध्ये गाळून घेतल्यानंतर मध टाकून तुम्ही चहा पिऊ शकता.

हेही वाचा :

  1. लहान मुलांमध्येही वाढतोय मूळव्याध; काय आहेत कारणं, वेळीच घ्या काळजी अन्यथा होऊ शकतो धोका - Increase piles In Children
  2. होळीचा मनसोक्त रंग उधळताना घ्या 'ही' आरोग्याची काळजी: नाहीतर धरावा लागेल रुग्णालयाचा रस्ता - Holi Festival 2024
  3. World Oral Health Day 2024: तोंड सांभाळून... मुखारोग्याकडं दुर्लक्ष केल्यानं कर्करोगात भारत आहे जगाची राजधानी!

Last Updated : Mar 27, 2024, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.