नवी दिल्ली- आधारकार्डचा हा उपयोग हा बँक खात्यांना जोडण्याबरोबरच सीम कार्ड खरेदी करण्यासाठी होतो. या चांगल्या सुविधेमुळे नागरिकांना फायदा होत आहे. पण, तुम्हाला माहित आहे का? त्याचा गैरवापरदेखील होऊ शकतो. अनेकदा आधार कार्डचा गैरवापर करून सीमकार्ड घेणाऱ्या टोळ्यांचा पोलिसांनी पर्दाफाशदेखील केला. तर चला जाणून घेऊ, तुमच्या आधार कार्डचा गैरवापर कसा थांबवायचा?
आपल्या नावानं कोणी सीमकार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्डचा वापर केला तर...देशात सायबर गुन्ह्यांचं वाढलेले प्रमाण आणि मोबाईल क्रमांकाला जोडलेली बँक खाती यामुळे तुम्ही अडचणीत सापडण्याची दाट शक्यता असते. तुमचा आधार कार्ड हे मोबाईल क्रमांकाबरोबर लिंक असणं आवश्यक आहे. ते असेल तरच तुम्हाला आधार कार्डचा ओटीपी मिळू शकणार आहे. आधार कार्डचा वापर कोणत्या मोबाईल क्रमांकासाठी वापरला जातोय, हे ओटीपीनं कळू शकते. अनेकवेळा सायबर गुन्हेगार सीमकार्डचा वापर करून गुन्हे करतात. आधारकार्ड करून दुसऱ्याच्या नावे सीमकार्ड खरेदी करतात.
असा करा वापर
- संचार साथी पोर्टल (tafcop.sancharsaathi.gov.in) वर Citizen Centric Services या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
- त्यापैकी Know Your mobile connections वर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचे सुरू असलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती मिळणार आहे.
- सुरुवातीला दहा अंकी क्रमांक एंटर करा, कॅप्चे टाईप करून क्लिक करा. त्यानंर तुमच्या मोबाईवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी स्क्रिनवर एंटर करा. त्यानंतर सर्व माहिती समोर येईल.
- तिथं तुम्हाला आधार कार्डचा वापर करून घेतलेली सीमकार्ड दिसू शकणार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही वापरत नसलेला मोबाईल क्रमांक असेल तर सावध व्हा. तो क्रमांक रिपोर्ट करून बंद करू शकता.
- जर तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून सायबर गुन्हा घडल्यास तुम्ही सायबर पोलिसांनी कळवू शकता. त्यासाठी सायबर क्राईमची १९३० ही हेल्पलाईन आहे. तुम्ही बिनचूक आणि सविस्तर माहिती दिल्यानंतर पोलीस आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून कारवाई करण्यात येते.
हेही वाचा-