How To Protect Your Hair At Night: प्रत्येक स्त्रीला लांब, सुंदर आणि जाड केस हवे असतात. केसांमुळे स्त्रीचे सौंदर्य खुलून दिसते. परंतु आज बहुतांश लोकं केस गळतीच्या समस्येनं त्रस्त आहेत. महागडे शॅम्पू आणि तेल वापरूनसुद्धा केस गळतीच्या समस्येचे निराकरण होत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे, वाढतं प्रदूषण अयोग्य जीवनशैली तसंच पौष्टिक घटकांचा आहारात सामावेश नसल्यामुळे देखील केसगळती होवू शकते. मानसिक ताण असल्यामुळे देखील केस गळू शकतात. विशेषतः बऱ्याच स्त्रियांचे झोपेच्या वेळी केस गळतात. तुम्हालाही झोपेच्या वेळी केस गळण्याची समस्या जाणवत असेल तर या 7 टिप्स फायदेशीर ठरू शकतात. यामुळे केसगळती तर थांबेलच शिवाय केस देखील चांगले होतील.
- सिल्क किंवा सॅटिक फॅब्रिकच्या उशा वापरा: कापसाच्या उशीमुळे केसांना धोका होवू शकतो. कारण डोकं आणि उशी घासली जाते. परिणामी केस गळतात. परंतु सिल्क किंवा सॅटिक फॅब्रिकच्या उशा टाळू आणि केसांवर वाढणारे नैसर्गिक तेल शोषून घेत नाही. तसंच या उशा मऊ असल्यामुळे डोक्याला घासल्यास केस तुटण्याची शक्यता कमी असते.
- ओल्या केसांनी कधीही झोपू नका: झोपण्यापूर्वी केस धुणे ही अनेकांची सवय असते. अंघोळ झाल्यावर बरेच जण केस ओले ठेवून झोपतात. तुम्ही ही चूक करू नका. कारण ओले केस कमकुवत असतात. परिणामी केस जास्त प्रमाणात तुटतात. त्यामुळे ओले केस ठेऊन कधीही झोपू नका. तसंच ओले केस ठेवून झोपल्यास टाळूवर बुरशीजन्य इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यामुळे ओले केस ठेवून झोपणे टाळा.
- पुरेशी झोप घ्या: झोपेच्या वेळी शरीरात ग्रोथ हार्मोन्स सोडले जातात. ज्यामुळे नवीन केसांची वाढ होते आणि खराब झालेले केस गळतात. यासाठी चांगली झोप घ्यावी. झोपेच्या कमतरतेमुळे कोर्टिसोलची पातळी वाढते आणि केसांचे नुकसान होते.
- झोपण्यापूर्वी केस विंचरा: रात्री झोपताना कंगवा करणे गरजेच आहे. यामुळे केसांमध्ये असलेला गुंता सोडवता येतो. यासाठी झोपण्यापूर्वी रुंद दात असलेल्या कंगव्याने किंवा पॅडल ब्रशने केस ब्रश करा. त्यामुळे झोपेत केस कमी गळतात. तसंच यामुळे केसांमध्ये रक्ताभिसरण चांगलं होते तसंच केसांची मुळं मजबूत होण्यास मदत मिळते.
- केस टाईट बांधू नका: झोपताना केस खूप टाईट बांधू नका. केस सैल सोडा. यामुळे केसांवर ताण येणार नाही परिणामी केस कमी तुटतील. केस मोकडे करुन झोपने चांगले फायदेशीर आहे. कारण यामुळे केसांवर कोणताही दाब पडत नाही. परिणामी केस कमी तुटतात.
- टाळूची मालिश करा: केसांच्या मुळांची किंवा टाळूची मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते. केसांच्या मुळांपर्यंत रक्त पोहोचते. यामुळे केस निरोगी राहतात आणि तुटण्याची समस्या कमी होते. नारळाच्या तेलाने डोक्याची मालिश करू शकता. केस गळणे देखील तुम्ही झोपलेल्या स्थितीवर अवलंबून असते. जर तुम्ही तुमच्या पाठीवर झोपाल तर चांगले. यामुळे डोके आणि उशीमधील घर्षण कमी होते आणि केस गळणेही कमी होते.
- पेप्टाइड्स असलेलं केस सीरम : तुम्हाला केस गळती कमी करायची असेल किंवा केसांची मुळं मजबूत करायची असतील तर पेप्टाइड्ससारखे घटक असलेले हेअर सीरम वापरणे चांगले आहे. हे टाळूला पोषण देण्यास मदत करते. यामुळे केस वाढतात आणि मजबूत देखील होतात.
संदर्भ
https://www.healthline.com/health/how-to-sleep-with-long-hair
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा