ETV Bharat / entertainment

राज कपूरमुळे बदलली झीनत अमानची इमेज, सोन्याची नाणी देऊन केलं होतं साईन

Zeenat Aman image : 'मॉडर्न गर्ल' अशी इमेज असलेल्या झीनत अमानला 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटात राज कपूर यांनी कास्ट केलं होतं.

Zeenat Aman
झीनत अमान (Image from Satyam Shivam Sundaram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

मुंबई - अभिनेत्री झीनत अमान यांनी 70 आणि 80 चं दशक गाजवलं होतं. याकाळात तिच्या नावावर अनेक हिट चित्रपट जमा झाले. रुपेरी पडद्यावर एक आधुनिक मुलगी म्हणून तिची इमेज तयार झाली होती. ती सामान्य दिसणाऱ्या गावाकडच्या मुलीच्या भूमिका करुच शकणार नाही असा समज निर्मात्यांसह प्रेक्षकांचाही झाला होता. या इमेजला तडा दिला तो "सत्यम शिवम सुंदरम" या चित्रपटानं. राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट तिला कसा मिळाला आणि तिनं आपली इमेज कशी बदलली याबद्दल इन्स्टाग्रामवर सविस्तर लिहिलं आहे.

झीनत अमान आपल्या पोस्टमध्ये लिहिते, "डिसेंबरमध्ये आपण सर्वजण राज कपूर यांची 100 वी जयंती साजरी करू." अशी सुरुवात करुन झीनत अमान यांनी पुढं लिहिलं की, "सत्यम शिवम सुंदरम"मध्ये त्यांनी मला 'रूपा' म्हणून कसे कास्ट केलं होतं याविषयी मी असंख्य वेळा सांगितलं आहे, पण तरीही इन्स्टाग्रामसाठी पुन्हा सांगत आहे.

१९७६ च्या सुमारास आम्ही 'वकील बाबू'चे शूटिंग करत होतो. राज कपूर मुख्य भूमिकेत होते, तर त्यांचा धाकटा भाऊ शशी कपूर आणि मी, प्रेमात पडलेल्या जोडप्याची भूमिका करत होते. टेकच्या दरम्यान सेटमध्ये बदल होत असताना, लाईट लावणं सुरू असताना आम्ही कलाकार मंडळी वेळ घालवण्यासाठी गप्पा मारत बसलो होतो.

राजजींचा त्यांच्या कलेकडं पाहण्याच एक मूलगामी दृष्टीकोन होता आणि ते बनवू इच्छित असलेल्या चित्रपटासाठी उत्साहाने भरलेला होता. एका स्त्रीच्या आवाजाच्या प्रेमात पडलेल्या पण तिच्या दिसण्याशी जुळवून घेऊ शकत नसलेल्या पुरुषाच्या कथेची कल्पना त्यांनी आम्हाला सांगितली. त्यांनी याबद्दल उत्कटतेनं सांगितलं. परंतु या चित्रपटाचा मी भाग होऊ शकेल असं कधीच सूचीत केलं नव्हतं. त्यावेळी मी स्वतःला स्टार समजत होते आणि मला कास्ट करण्यात त्यांचा रस नसल्यामुळे मला त्रास होऊ लागला. मला माहित होते की माझी मिनी स्कर्ट आणि बुटातील “मॉडर्न इमेज” यासाठी खटकत असावी म्हणून मी हे प्रकरणं स्वतः हाताळायचं ठरवलं.

मला माहिती होतं की, राजजी त्यांचा फावला वेळ हा त्यांच्या आरके स्टुडिओतील कॉटेज सेटवर घालवतात. या ठिकाणीच ते मिटींग करतात किंवा छोटे कार्यक्रमाही करत असतात. म्हणून मी माझी हालचाल केली. एका संध्याकाळी, शूटींग लवकर आटोपल्यानंतर, मी माझ्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन गेटअपमधून बाहेर पडत स्वतःला तयार करण्यासाठी अतिरिक्त 30 मिनिटे घालवली. मी घागरा चोली घातली, माझे केस विंचरुन वेणी घातली आणि गावाकडच्या मुलीचं रुप धारण केलं.

जेव्हा मी कॉटेजला पोहोचले तेव्हा राजजींचा राईट हँड असलेला जॉन दारातच उभा होता, त्यानं माझं स्वागत केलं. त्याला मी म्हटलं की, "सायबांना सांग की 'रुपा' आली आहे." माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि मी त्यांच्या नजरेस पडले. मी गावाकडच्या मुलीच्या वेशात आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला.

मला नंतर कळलं की माझ्या सारख्या अभिनेत्रीनं स्वतःला सिद्ध केलेलं पाहून ते खूप प्रभावित झाले होते. त्यांनी हसून झाल्यानंतर फोन करण्याचं निमित्त केलं. 20 मिनीटानंतर त्यांची सुंदर पत्नी कृष्णाजी पर्समध्ये सोन्याच्या नाण्यासह आल्या. राजजी यांनी मला साईनची रक्कम म्हणून मुठभर सोन्याची नाणी दिली आणि मी रुपा बनले.

काही वर्षांपूर्वी माझ्या घरातून ते चोरीला जाईपर्यंत मी अनेक दशके ही नाणी माझ्यासाठी जवळच ठेवली होती. त्यांची आठवण आणि ही नाणी यातलं पर्याय निवडायला सांगितला तर मी त्यांची आठवण निवडेन."

"राज कपूर यांच्याबरोबरचा माझा हा अप्रतिम फोटो. माझ्या आयुष्यभर या प्रसंगाला विसरु शकणार नाही, " असं लिहित झिनत अमाननं त्यांनी केलेल्या मेकअपमुळं ती कशी उजळून गेली याबद्दल लिहिलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.