ETV Bharat / entertainment

रवी किशनसाठी 'लापता लेडीज' ठरला 'पान इंडिया' चित्रपट, शूटिंगमध्ये खावी लागली 160 पानं - Ravi Kishan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Laapataa Ladies: ऑस्करला जाणाऱ्या 'लापता लेडीज' चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता रवी किशनला चक्क 160 पानं खावी लागली होती. याबद्दल त्यानं एका संवादादरम्यान सांगितलं आहे. आता हा चित्रपट ऑस्कर अवॉर्ड जिंकेल अशी आशा केली जात आहे.

Laapataa Ladies
लापता लेडीज (Movie Poster)

मुंबई - Laapataa Ladies : भोजपुरी स्टार रवी किशन कोणताही चित्रपट असो, तो आपल्या अभिनयानं प्रत्येकाचं मन जिंकत असतो. रवी नुकताच आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव यांच्या सोशल ड्रामा कॉमेडी चित्रपट 'लापता लेडीज'मध्ये दिसला होता. ऑस्कर 2025 साठी परदेशी भाषा श्रेणीमध्ये 'लापता लेडीज'ची निवड झाली आहे. हा चित्रपट ऑस्कर एंट्रीमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. या चित्रपटात रवी किशननं पोलिसची भूमिका साकारली होती. यात रवी किशनचा खाकी वर्दीमधील जबरदस्त अभिनय पाहायला मिळाला आहे. आता रवीनं या चित्रपटाशी संबंधित एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे.

रवि किशनचा पहिला पान इंडियन चित्रपट : रवी किशननं 'लापता लेडीज'साठी खूप मेहनत घेतली आहे. त्यानं या चित्रपटात पोलिसाची भूमिका वास्तववादी साकारण्यासाठी त्याला शूटिंग दरम्यान 160 पानं खावी लागली होती. रवी किशननं 'लापता लेडीजबद्दल सांगितलं, "लापता लेडीज'च्या शूटिंगदरम्यान मला 160 पानं खावी लागली होती, पण सुदैवानं आजही मला त्याचं व्यसन लागलेलं नाही. किरणजी यांची इच्छा होती की, माझे पात्र असे असले पाहिजे की, जे नेहमीच काही ना काही तरी चघळत असेल. त्यांनी मला समोसा सुचवला होता, मी त्यांना पान योग्य होईल असं सांगितलं, म्हणून हा माझा पहिला 'पान' इंडिया चित्रपट आहे. यानंतर त्या खूप हसायला लागला होत्या."

'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीत : 'लापता लेडीज' 1 मार्च 2024 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटानं प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं. 'लापता लेडीज' चित्रपटाची निर्मिती आमिर खाननं केली असून त्याचं दिग्दर्शन किरण राव यांनी केलं आहे. यापूर्वी चित्रपटात पोलिसाची भूमिका आमिर खानला दिली जात होती, मात्र तो या पात्रात ठिक वाटला नसता, म्हणून रवी किशनला ही सुवर्ण संधी मिळाली. आता संपूर्ण देशाला आशा आहे की 'लापता लेडीज' ऑस्कर जिंकेल. हा चित्रपट मनाला भिडणार आहे. या चित्रपटामध्ये महिलांना पुढं जाण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो आणि समाजाला किती बदलण्याची गरज आहे, हे दाखविण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. फिल्म फेडरेशनच्या निवेदनावर 'लापता लेडीज'च्या लेखिका स्नेहा देसाई नाराज - Laapataa Ladies
  2. ऑस्करसाठी 29 चित्रपटांपैकी फक्त 'लापता लेडीज'ची का निवड झाली ? कारण आलं समोर - Laapataa Ladies
  3. रवी किशनने उलडले 'लापता लेडीज'मधील इन्स्पेक्टरच्या भूमिकेचे रहस्य - Laapataa Ladies Oscar entry

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.