मुंबई : 2024 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवस उरले आहे. या वर्षामध्ये अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आली होती, यामधील बरीच चित्रपट हिट तर काही फ्लॉप झाली होती. 2023 प्रमाणेच 2024 हे वर्षही मनोरंजन आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या दृष्टीनं उत्तम ठरलं. चालू वर्षात 'हनुमान', 'कल्की 2898 एडी', ' फायटर', ' देवरा पार्ट 1', 'भूल भुलैया 3', 'स्त्री 2','सिंघम अगेन' आणि बरीच चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल झाली होती. 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2 द रुल' आहे. हा चित्रपट आता देखील बॉक्स ऑफिसवर खूप वेगानं कमाई करत आहे. 2024मध्ये अनेक बिग बजेट चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शित केली होती, यानंतर अनेकांचे पैसे देखील बुडाले होते. 250 कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या बॉलिवूड आणि साऊथच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
- बॉलिवूडचे 250 कोटी बजेटचे फ्लॉप चित्रपट
'बडे मियाँ लहान मियाँ' : अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर मास ॲक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' 350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 59.17 कोटी कमाई केली होती, तर जगभरात या चित्रपटानं 102.16 कोटी रुपये कमावले होते. 'बडे मियाँ छोटे मियाँ' 2024चा फ्लॉप चित्रपट ठरला आहे.
'मैदान' : बॉलिवूड स्टार अजय देवगण अभिनीत स्पोर्ट्स फिल्म 'मैदान' हा 2024मधील फ्लॉप चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ यांनी केलं होतं. हा चित्रपट चालू वर्षाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं एकूण बजेट 250 कोटी रुपये होतं. 'मैदान'नं पहिल्या आठवड्यात 28.35 कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात 10.25 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 80 लाखांची कमाई केली. 'मैदान' चित्रपटाचं जगभरातील एकूण कलेक्शन 68 कोटी आहे. मैदान 'फ्लॉप' झाल्यामुळे निर्मात्यांना 150 कोटींहून अधिक रुपयांचा तोटा झाला.
- 2024 चे बॉलिवूडचे कमी बजेटचे फ्लॉप चित्रपट
क्रॅक- (बजेट 80 कोटी आणि कमाई- 12 कोटी)
जिगरा- (बजेट- 80 कोटी रुपये आणि कमाई- 23.60 कोटी)
खेल-खेल में- (बजेट- 100 कोटी आणि कमाई- 29.1 कोटी.)
सरफिरा- (बजेट- 100 कोटी आणि कमाई- 32 कोटी.)
मैरी क्रिसमस - (बजेट- 60 कोटी आणि कमाई- 12 कोटी.)
द बकिंघम मर्डर्स - (बजेट- 40 कोटी आणि कमाई- 7.53 कोटी.)
वेदा - (बजेट- 60 कोटी आणि कमाई- 25.93 कोटी.)
योद्धा (बजेट- 66 कोटी आणि कमाई- 33 कोटी.)
ओरों में कहां दम था - (बजेट- 100 कोटी आणि कमाई- 12.91 कोटी.)
- साऊथ सिनेमाचे 250 कोटी बजेटचे फ्लॉप चित्रपट
'इंडियन 2' : साऊथ सुपरस्टार कमल हासन स्टारर 'इंडियन 2' 12 जुलाई 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. अडीच दशकांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. शंकर दिग्दर्शित 'इंडियन 2' हा चित्रपट 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. 'इंडियन 2'नं जगभरात सुमारे 150 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या चित्रपटानं भारतात 83 कोटी रुपये आणि परदेशात 53 कोटी रुपयांची कमाई केली होती.
'कांगुवा' : तमिळ सुपरस्टार सुर्या स्टारर पीरियड ड्रामा 'कांगुवा' हा 14 नोव्हेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. 'कांगुवा' चित्रपट रुपेरी पडद्यावर अपयशी ठरला. हा चित्रपट 350 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 58.62 कोटी रुपयांचे जगभरात कमाई केली होती. तर हिंदी आवृत्तीत 'कांगुवा'नं 3.25 कोटीचा व्यवसाय केला होता. रिपोर्टनुसार, 14 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज झालेल्या 'कांगुवा'चं जगभरातील एकूण कलेक्शन 106.41 कोटी रुपये आहे. या चित्रपटानं भारतात 82.41 कोटींची कमाई केली आहे.
'देवरा पार्ट 1 ' : साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर अभिनीत चित्रपट 'देवरा पार्ट 1'कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. या चित्रपटाचं एकूण बजेट 300 कोटी रुपये होतं. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'देवरा पार्ट 1'नं भारतात 292.03 कोटी रुपये आणि जगभरात 421.63 कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट आपले बजेट वसूल करण्यात यशस्वी ठरला, मात्र जूनियर एनटीआरच्या स्टारडमचा विचार करता, 'देवरा पार्ट 1' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेल्या चित्रपटांमध्ये गणला जात आहे.
2024 साउथ सिनेमाचे इतर फ्लॉप (सॅकनिल्क)
ईगल- (बजेट- 35 कोटी रुपये आणि कमाई- 30 कोटी)
ऑपरेशन व्हॅलेंटाईन - (बजेट - 42 कोटी आणि कमाई - 9.75 कोटी)
फॅमिली स्टार- (बजेट- 50 कोटी आणि कमाई- 30.65 कोटी)
डबल आय-स्मार्ट- (बजेट-90 कोटी रुपये आणि कमाई- 19 कोटी)
मिस्टर बच्चन - (बजेट- 70 कोटी रुपये आणि कमाई- 13.5 कोटी)