मुंबई : भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील अशी अनेक जोडपी होती, ज्यांनी या वर्षात त्यांच्या नात्याला ब्रेक लावला. या जोडप्यांनी लग्न मोडून सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता अशाच काही जोडप्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीमुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. या जोडप्यांबद्दल बरीच चर्चा सोशल मीडियावर देखील झाली होती. चला तर मग जाणून घेऊया, या सेलिब्रिटी कपल्सबद्दल ज्यांनी यावर्षी आपल्या पार्टनरपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
“We had hoped to reach the grand thirty, but all things, it seems, carry an unseen end. Even the throne of God might tremble at the weight of broken hearts. Yet, in this shattering, we seek meaning, though the pieces may not find their place again. To our friends, thank you for…
— A.R.Rahman (@arrahman) November 19, 2024
एआर रहमान-सायरा बानो : प्रसिद्ध गायक-संगीतकार एआर. रहमान सायरा बानूपासून विभक्त झाल्याच्या बातमीमुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. त्यांची घटस्फोटाची बातमी खूप चर्चेत होती. एआर. रहमान आणि त्यांची विभक्त झालेली पत्नी सायरा बानो यांनी 19 नोव्हेंबर 2024 रोजी आपलं वैवाहिक जीवन संपुष्टात आणलं. या जोडप्यानं त्यांच्या विभक्त होण्याचे कारण भावनिक मतभेद असल्याचं सांगितलं. एआर. रहमान आणि सायरा बानू यांची जोडी भारतीय मनोरंजन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक मानले जाते. आतापर्यंत दोघांनी घटस्फोट घेतलेला नाही. दोघेही नेहमीच चांगले मित्र असणार, असं या दोघींनी एका पोस्टव्दारे सांगितलं होतं.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टॅनकोविक यांनी यावर्षी जुलैमध्ये घटस्फोटाची घोषणा केली. या जोडप्याला एक मुलगा देखील आहे, त्याचं नाव अगस्त्य आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानं 31 मे 2020 रोजी नताशाबरोबर लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 4 वर्षानंतर या जोडप्यानं वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हार्दिक आणि नताशा यांनी 18 जुलै 2024 रोजी इंस्टाग्रामवर घटस्फोटाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. यानंतर या हाय-प्रोफाइल ब्रेकअपबद्दल चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं होतं.
ईशा देओल आणि भरत तख्तानी : ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलनं 29 जून 2012 रोजी भरत तख्तानीबरोबर लग्न केलं होतं. जानेवारी 2024च्या सुरुवातीला त्यांनी 11 वर्षांचे वैवाहिक जीवन संपवून घटस्फोट घेतला. ईशा आणि भरतच्या लग्नाला एक दशकाहून अधिक काळ झाला आहे, त्यामुळे त्याच्या घटस्फोटाची बातमी ही अनेकांना चकित करणारी होती. ईशा आणि भरत यांना दोन मुली असून त्यांची नावे राध्या आणि मिराया आहेत.
Dalljiet Kaur And Nikhil Patel Unfollow Eachother on Instagram, Remove Wedding Photos Amid Divorce Rumours. Check 👇https://t.co/ku3jBt4z61... pic.twitter.com/TGK9PWjL64
— Womansera (@WomansEra2) February 21, 2024
दलजीत कौर आणि निखिल पटेल : टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरनं मे 2024 मध्ये तिचा बिझनेसमन लाइफ पार्टनर निखिल पटेलबरोबर घटस्फोट घेतला. या जोडप्यानं त्यांच्या विभक्त होण्याचं कारण परस्पर मतभेद असल्याचं सांगितलं. लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांनंतर निखिल पटेलनं दलजीतबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दलजीतनं निखिलवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता. दलजीत कौर आणि निखिल पटेलनं 10 मार्च 2023 रोजी लग्न केलं होतं. दलजीतनं निखिलविरुद्ध गैरवर्तन आणि विश्वासघाताचा गुन्हाही दाखल केला आहे.
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत : साऊथ स्टार धनुष आणि फिल्म मेकर ऐश्वर्या रजनीकांत हे 2024 मध्ये विभक्त झाले. त्यांचे 18 वर्षांचे वैवाहिक जीवन त्यांनी संपुष्टात आले आहे. त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीमुळे अनेकजण नाराज झाले होते. विभक्त होऊनही, दोघांनी एकत्र घालवलेल्या वेळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत एक पोस्ट केली होती. या दोघांना दोन मुलं असून त्यांची नावे यात्रा आणि लिंग अशी आहेत.