ETV Bharat / entertainment

'वेट्टियान'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना एक्स रिव्ह्यू

X review of Vettiyan : रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांना खूप वर्षानंतर एकत्र पाहण्यासाठी आतुर झालेल्या चाहत्यांनी 'वेट्टियान'चा पहिल्या दिवशी पहिला शो पाहिला.

X review of Vettiyan
'वेट्टियान'चा फर्स्ट डे फर्स्ट शो (Vettiyan poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 10, 2024, 1:05 PM IST

Updated : Oct 11, 2024, 1:54 PM IST

मुंबई - रजनीकांत, अमिताभ बच्चन आणि फहाद फाजिल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'वेट्टियान' चित्रपट आज 10 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. हा चित्रपट जगभरातील स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'जेलर' या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांना 'वेट्टियान'कडून मोठ्या अपेक्षा आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी हा चित्रपट जेलरपेक्षा जास्त आवडल्याचं दिसत नाही.

'वेट्टियान' चित्रपटाचे एक्स रिव्ह्यू...

सुपरस्टार रजनीकांतचा जलवा पहिल्या 20 मिनीटांत पाहायला मिळतो. त्यानंतर या चित्रपटाचं कथानक गुन्हाच्या तपासाच्या दिशेनें पुढं सरकतं. चित्रपटातील गाणी खूप छान आहेत., असं एका युजरनं म्हटलंय.

दुसऱ्या एका चाहत्यानं 'वेट्टियान'च्या उत्तरार्धाबद्दल लिहिलंय, चित्रपटात चकित करुन सोडणारे दोन स्वतंत्र ट्रॅक आहेत. कथानक प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी झालंय.

आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ' चित्रपटाचा पहिला भाग दिग्दर्शकाचा आहे तर चित्रपटाचा दुसरा भाग थलैयवाचा आहे. बाकी सर्व पात्रांनी त्यांचा उत्कृष्ट अभिनय केला आहे. अमिताभ बच्चन - टॉप, दुशारा - शानदार, फहद फासिल आणि मंजू वॉरियरचे मास सीन उत्कृष्ट झाले आहेत.

चित्रपटाबद्दल 'वेट्टियान' हा रजनीकांत यांचा 170 वा चित्रपट आहे. चेन्नईशिवाय हैदराबाद, मुंबई आणि तिरुअनंतपुरमसह भारतातील अनेक सुंदर ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 160 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक असणार आहे.

या चित्रपटात रजनीकांतबरोबर बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय राणा दग्गुबती, फहद फासिल, मंजू वॉरियर, रितिका सिंग, रोहिणी, दुशरा विजयन, राव रमेश आणि रमेश थिलक या कलाकारांचाही या चित्रपटात समावेश आहे. चित्रपटाच्या प्रोमो आणि ट्रेलरला उदंड प्रतिसाद मिळाला असून प्रेक्षक या चित्रपटाला तितकेच प्रेम देतील अशी अपेक्षा आहे.

Last Updated : Oct 11, 2024, 1:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.