मुंबई - World Cancer Day 2024: आज 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. चित्रपटसृष्टीतील सेलेब्सलादेखील वैयक्तिक आयुष्यात अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु ते नेहमी त्यांच्या चाहत्यांसमोर हसताना आणि आनंदी दिसतात. सेलिब्रिटींच्या आयुष्यात अनेक समस्या असतात. चित्रपटसृष्टीतील काही कर्करोगांना सारख्या मोठ्या आजाराचा सामना करावा लागला आहे. आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत, त्यांनी कॅन्सरशी लढा देऊन हिंमत दाखविली.
- सोनाली बेंद्रे : अनेक हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम केलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेला 2018 मध्ये कॅन्सर झाल्याचं निदान झालं होते. सोनालीनं एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, ''मला जेव्हा कॅन्सरचे निदान झाले, तेव्हा माझ्यावर उपचार सुरू झाले. यामध्ये केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये मी रिकव्हर झाले.''
- किरण खेर : अनुपम खेर यांची पत्नी आणि अभिनेत्री किरण खेर यांनीही या धोकादायक आजाराशी लढा दिला आहे. 2021 मध्ये त्यांना कर्करोग झाला. याबद्दल अनुपम खेर यांनी सांगितलं होत. किरण या कॅन्सरमधून बऱ्या झाल्यावर त्यांनी याबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती.
- अनुराग बसू : अनुराग बसू एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि कथा लेखक आहेत. चित्रपट निर्मितीव्यतिरिक्त त्यांनी शिल्पा शेट्टी आणि गीता कपूर यांच्यासोबत डान्सिंग रिॲलिटी शो 'सुपर डान्सर'मध्ये परीक्षक म्हणून काम केलं आहे. बसू यांना 2004 मध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले. यावेळी त्यांची पत्नीही गरोदर होती. अनुरागनं सांगितले की, ''हा काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. केमोथेरपीच्या काही सत्रानंतर तो बरा झाला.''
- ताहिरा कश्यप : अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनेही कॅन्सरशी लढा दिला आहे. 2018 मध्ये तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. पण तिनं हिंम्मतीनं या रोगाचा पराभव केला. आयुष्मान नेहमीच याबद्दल मोकळेपणाने बोलतो आणि त्यासाठी जनजागृतीही करतो.
हेही वाचा :