ETV Bharat / entertainment

जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या, 'स्त्री 2' ते 'कल्की 2898 एडी'पर्यंतच्या चित्रपटांचं कलेक्शन - World bollywood day - WORLD BOLLYWOOD DAY

World bollywood day 2024 : 'स्त्री 2' ते 'कल्की 2898 एडी' पर्यंतच्या चित्रपटांनी रुपेरी पडद्यावर भरपूर नफा मिळवला. जागतिक बॉलिवूड दिनानिमित्त चित्रपटाची कमाई जाणून घ्या.

World bollywood day 2024
जागतिक बॉलिवूड दिन 2024 (जागतिक बॉलिवूड दिन 2024 (Film Posters/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 11:06 AM IST

मुंबई - World bollywood day 2024 : 24 सप्टेंबर रोजी जागतिक बॉलिवूड दिन साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी या वर्षातील काही सर्वोत्तम चित्रपटांबद्दल माहिती जाणून घ्या. या चित्रपटांनी पडद्यावर धमाकेदार कमाई केली आहे. दरवर्षी एखादा चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रचंड यशस्वी होतो. यावर्षी अनेक सुपरहिट चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाले. त्यापैकी काहींना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. याशिवाय काही चित्रपटांनी कौतुकाबरोबर बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रमही रचले. या वर्षातील सर्वोत्तम चित्रपट कुठले आहेत? हे माहित करून घ्या.

'स्त्री 2' : यावर्षी, यादीतील सर्वात वरचे नाव 'स्त्री 2'चं आहे. हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त कमाई करत आहे. 'स्त्री 2' चित्रपट इतका चांगला की, याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी यांसारखे स्टार्स असलेल्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटानं उत्कृष्ट कथानकामुळे प्रेक्षकांकडून खूप वाहवा मिळाली आहे. 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्डदेखील तोडले आहेत. 'स्त्री 2' हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'स्त्री 2' हा कमी बजेटचा चित्रपट आहे. दरम्यान जगभरातील कमाईबद्दल बोलायचं झालं या चित्रपटानं जवळपास 815 कोटी रुपये कमावले आहेत.

'कल्की 2898 एडी': साऊथ अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'कल्की 2898 एडी' हा वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. हा पॅन इंडिया चित्रपट असून देशातील बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. 'कल्की 2898 एडी'नं जगभरात एकूण 1042.15 कोटी कमावले आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचं कलेक्शन 774 कोटी आहे.

'फायटर': भारतीय वायुसेनेवर आधारित 'फायटर'मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर चांगली कमाई केली. 'फायटर'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटानं जगभरात 337.2 कोटी रुपयांचे कलेक्शन केलंय. याशिवाय याचं घरगुती कलेक्शन 243 कोटी रुपयांचं झालं आहे. हृतिक आणि दीपिकाबरोबर या चित्रपटात अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय हे कलाकार होते.

'शैतान': अभिनेता अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका स्टारर 'शैतान' हॉरर ड्रामा चित्रपट मार्च 2024 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 2023 मध्ये आलेल्या गुजराती चित्रपट 'वश'चा रिमेक आहे. 'शैतान' चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी केली. 'शैतान'नं जगभरात एकूण 213.79 कोटी आणि देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 178 कोटी कमावले. या चित्रपटाची निर्मिती 60-65 कोटीच्या बजेटमध्ये झाली आहे.

हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त यावर्षी अनेक भारतीय चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.

1. गोट (द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम)

2. हनु-मान

3. मंजुमल बॉयज

4. द गोट लाइफ

6. आवेशम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.