मुंबई - चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी २३ डिसेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला. वयाशी संबंधित आजारानं त्रस्त असलेल्या श्याम बेनेगल यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल यांनी टीव्ही ते सिनेमापर्यंत त्यांच्या सर्जनशील कामामुळे खूप लोकप्रियता मिळवली. श्याम बेनेगल त्यांच्या एका मालिकेमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या मालिकेत त्यांनी रामायण, महाभारत, चाणक्य, मुघल सल्तनत आणि स्वातंत्र्याचा लढा यांची कथा दाखवली आहे. ही मालिका बनवणे श्याम बेनेगल यांच्यासाठी एक आव्हानात्मक काम होतं. यासाठी त्यांनी अनेक इतिहासकारांची आणि हजारो पुस्तकांची मदत घेतली.
भारत एक खोज
खरंतर ही मालिका भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकावर आधारित होती. या पुस्तकात नेहरूंनी भारताचा 5000 वर्षांचा इतिहास दाखवला आहे, जो श्याम बेनेगल यांनी त्यांच्या 'भारत एक खोज' या टीव्ही मालिकेत दाखवला आहे. भारत एक खोज ही मालिका 1988 मध्ये प्रसारित झाली. ही मालिका 53 भागांची होती. या मालिकेची सुरुवात 14 नोव्हेंबर 1988 रोजी जवाहरलाल नेहरूंच्या जयंती दिवशी झाली होती.
एकाच अभिनेत्याने साकारल्या अनेक भूमिका
बजेट आणि स्क्रिप्ट लक्षात घेऊन श्याम बेनेगल यांनी या शोमध्ये एकाच अभिनेत्याला अनेक भूमिका साकारायला लावल्या. भारत एक खोजमध्ये सलीम घोष यांनी कृष्ण, राम आणि टिपू सुलतान, ओम पुरी यांनी सम्राट अशोक, दुर्योधन आणि औरंगजेब यांच्या भूमिका साकारल्या होत्या. हा कार्यक्रम दूरदर्शनवरही अनेकदा प्रसारित झाला आहे. जुन्या काळात भारत एक खोज या मालिकेच्या डीव्हीडीही चांगल्या विकल्या जात होत्या.
10000 पुस्तके आणि 15 इतिहासकार
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा श्याम बेनेगल यांनी ही मालिका बनवण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी मदतीसाठी 10 हजार पुस्तके आणि 15 दिग्गज इतिहासकारांना बरोबर ठेवलं होते. श्याम बेनेगल यांना या मालिकेतील इतिहासाच्या एकाही सत्याकडे बोट दाखवावेसे वाटले नाही. त्याचवेळी श्याम साहेबांनी 40 तज्ञांची प्री-प्रॉडक्शन टीमही नेमली होती.
श्याम बेनेगल यांच्या इतर लोकप्रिय मालिका
यात्रा
श्यामने 1986 मध्ये आपली पहिली टीव्ही सीरियल 'यात्रा' बनवली होती. ही एक प्रवासावर आधारित मालिका होती, ज्याचे एकूण 15 भाग होते. ही मालिका भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग हिमसागर एक्सप्रेसमध्ये चित्रित करण्यात आली होती.
कथा सागर
'यात्रा' प्रसारित झाली त्याच वर्षी म्हणजे 1986 मध्ये श्याम बेनेगल साहेबांनी 'कथा सागर' ही टीव्ही मालिका बनवली. त्यात पंकज बेरी, सुप्रिया पाठक आणि सईद जाफरी या कलाकारांचा समावेश होता. या मालिकेचे 44 यशस्वी भाग प्रसारित झाले.
'अमरवती की कथाएं'
'अमरवती की कथाएं' ही श्याम साहेबांची लोकप्रिय टीव्ही मालिका आहे, ज्यामध्ये 'पंचायत'मध्ये प्रधानची भूमिका साकारणाऱ्या रघुबीर यादवनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेत त्याच्यासोबत नीना गुप्ताही होती.
संविधान
'भारत एक खोज' नंतर श्याम बेनेगल यांनी 2014 मध्ये 'संविधान' हा टीव्ही मालिका बनवली. या मालिकेत संविधान निर्मितीची कहाणी दाखवण्यात आली होती. 10 भागांचा हा शो यूट्यूबवर उपलब्ध आहे.