ETV Bharat / entertainment

नरेंद्र मोदी विजय होतील का? हिमालयात जाण्यापूर्वी रजनीकांतनं दिलं उत्तर, काय ते जाणून घ्या... - Rajinikanth - RAJINIKANTH

सुपरस्टार रजनीकांत त्याचा आगामी 'कुली' चित्रपटाचा शूटिंग सुरू करण्यापूर्वी हिमालयाच्या अध्यात्मिक सहलीसाठी जात आहे. 29 मे रोजी तो हिमालयाकडे निघताना चेन्नई विमानतळावर दिसला. प्रसारमाध्यमांनी त्याच्यावर राजकीय प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. नरेंद्र मोदी पुन्हा विजयी ठरतील का इथं पासून तामिळ फिल्म उद्योगत सुरू असलेल्या म्यूझिकच्या वादावर त्याला विचारण्यात आलं. शिताफीनं या सर्व प्रश्नांची उत्तर देणं त्यानं टाळली आहेत.

Rajinikanth
सुपरस्टार रजनीकांत ((Photo: ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 4:32 PM IST

मुंबई - रुपेरी पडद्यावरचा प्रतिष्ठित अभिनेता रजनीकांत गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. दिग्दर्शक टीजे ज्ञानवेलच्या 'वेट्टयान' चित्रपटाचं शूटिंग आता पूर्ण झाल्यानं रजनीकांत आता लोकेश कनागराज दिग्दर्शित 'कुली' हा त्याचा पुढचा चित्रपट सुरू करणार आहे. असं असलं तरी दुसऱ्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यानं हिमालयात आध्यात्मिक सहलीसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

29 मे रोजी मेगास्टार रजनीकांत हिमालयाकडे निघण्याआधी चेन्नई विमानतळावर दिसला. केदारनाथसारख्या पवित्र स्थळांना भेट देण्याचीही त्याची योजना आहे. रजनीकांतनं आपल्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मी दरवर्षी हिमालयात जातो. मी यावेळी केदारनाथ आणि बद्रीनाथ सारख्या आध्यात्मिक स्थळांना भेट देणार आहे. वेट्टय्यान चित्रपट चांगला बनला आहे," असं सांगून त्यानं वेट्टयानच्या निर्मितीवर समाधान व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या शक्यतांबद्दल त्याला विचारलं असता रजनीकांतनं नम्रपणे भाष्य करण्यास नकार दिला आणि "माफ करा, कोणताही राजकीय प्रश्न करु नका," असं म्हणाला. संगीत आणि गीतांच्या महत्त्वाबाबत तामिळ चित्रपट उद्योगात सुरू असलेल्या वादविवादाबद्दल विचारलं असता, त्यानं "नो कॉमेंट्स" अशी साधी प्रतिक्रिया देत भूमिका न घेणे पसंत केलं.

'कुली' टायटल टीझरसाठी इलैयाराजाच्या कॉपीराइट नोटिससह सर्व कामाशी संबंधित आणि राजकीय आरोप असलेले प्रश्न रजनीकांतनं कुशलतेनं बाजूला सारले. अवघ्या एक दिवस अगोदर, 28 मे रोजी अबू धाबीहून परत आल्यानंतर, रजनीकांतनं हिमालयात तिर्थयात्रा करण्यासाठी वेळ घालवला नाही.

रजनीकांत हिमालयाच्या सहली दरम्यान महावतार बाबाजी गुहेला भेट देणार आहे. या ठिकाणी त्यानं यापूर्वीही भेट दिली होती. खरं तर, नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर' चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी त्यानं या गुहेला शेवटचे भेट दिली होती. हिमालयातील त्याची आताची सहल एक आठवडा चालेल अशी अपेक्षा आहे, त्यानंतर रजनीकांत चेन्नईला परतेल आणि कुलीच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल.

हेही वाचा -

  1. एआर रहमान यांनी पूर्ण केला 'रायन'चा बॅकग्राऊंड स्कोअर, धनुषनं शेअर केली पोस्ट - AR Rahman
  2. 'पुष्पा 2'च्या दुसऱ्या गाण्यानं 'याड' लावलं, अल्लु अर्जुन आणि मंदान्नाच्या डान्स स्टेप्सची प्रेक्षकांना भुरळ - Pushpa 2 Angaaron Lyrical Video
  3. विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचा नाद सोडा अन् संगीतात रममाण व्हा; 'लिटिल चॅम्पचा' बालमित्रांना सल्ला - Geet Bagde Advice To Child

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.