ETV Bharat / entertainment

वायनाड भूस्खलनग्रस्तांच्या मदतीकरिता सेलिब्रिटी सरसावले; धनुषनं दिली 'इतकी' देणगी - Raayan Star Dhanush - RAAYAN STAR DHANUSH

Dhanush Donates Wayanad Victims: वायनाड भूस्खलनामुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी अनेक कलाकारांनी मदतनिधी दिला आहे. आता यामध्ये एका आणखी साऊथ सुपरस्टारचं नाव जोडलं गेलं आहे. नुकतेच धनुषनं भूस्खलनग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे.

Dhanush Donates Wayanad Victims
धनुषनं वायनाड पीडितांना दिली देणगी (धनुष (IANS/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 5:48 PM IST

मुंबई - Dhanush: प्रसिद्ध अभिनेता धनुष आता चर्चेत आला आहे. केरळमधील वायनाड येथील विनाशकारी भूस्खलनाच्या पीडितांना मदत करण्यासाठी 25 लाख रुपये देण्याची घोषणा त्यानं केली आहे. 30 जुलै रोजी वायनाड भूस्खलन झाल्यानंतर 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.

अभिनेता राम चरण, चिरंजीवी, अल्लू अर्जुन आणि मोहनलाल यांच्यासह अनेक चित्रपट कलाकारांनी पीडितांच्या मदतीसाठी पुढे येऊन लाखो रुपयांची मदत केली. आता अलीकडेच, सुपरस्टार धनुषनेही मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं पीडितांसाठी प्रार्थना केली आहे. धनुष व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू आणि मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांनी पीडितांना मदतीचा हात दिला आहे.

साऊथ स्टार्सन केली मदत : धनुष व्यतिरिक्त विजय, महेश बाबू आणि मोहनलाल यांसारख्या सेलिब्रिटींनी वायनाड भूस्खलनग्रस्तांच्या देणगी दिली आहे. तसेच साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती-चित्रपट निर्माता विघ्नेश शिवन भूस्खलनग्रस्तांना 20 लाख रुपयांची मदत केली. सतत आणि मुसळधार पावसामुळे वायनाडमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं. वायनाड भूस्खलनामुळे अनेकांची घरे उद्धवस्त झाली आहेत. केरळमधील लोकांचं खूप आर्थिक नुकसान झालं आहे.

धनुषचं वर्कफ्रंट : पावसामुळे वायनाडच्या मुंडक्काई , चुरलमाला, वेल्लारीमाला गावात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालंय. यानंतर तिथे पोलीस ,अग्निशमन दल आणि जवानांचं अजूनही बचाव कार्य सुरू आहे. 100हून अधिक रुग्णवाहिका, डॉक्टर, आणि इतर वैद्यकीय कर्मचारी उपचारासाठी याठिकाणी हजर आहेत. धनुषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या 'रायन'च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाचं चाहत्यांनी आणि समीक्षकांनीही खूप कौतुक केलं आहे. आता पुढं धनुष हा 'कुबेर' या चित्रपटामध्ये नागार्जुन अक्किनेनी आणि रश्मिका मंदान्ना यांच्याबरोबर दिसणार आहे. शेखर कम्मुला दिग्दर्शित 'कुबेर'चे निर्माते पुस्कुर राम मोहन राव आणि नारायण दास के. नारंग हे आहेत. याशिवाय तो 'इलैयाराजा' चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये धनुष हा संगीतकार इलैयाराजा यांची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा :

  1. धनुषच्या वाढदिवसानिमित्त 'कुबेर' निर्मात्यांनी केलं नवीन पोस्टर रिलीज, पाहा लूक - Dhanush Birthday
  2. 'रायन' आणि 'डेडपूल अ‍ॅन्ड वूल्वरिन'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केला बॉक्स ऑफिसवर धमाका - box office collection
  3. धनुषच्या 'रायन'मधील उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि दिग्दर्शक म्हणून योगदानाचं चाहत्यांनी 'ब्लॉकबस्टर' म्हणत केलं कौतुक - Dhanush Rayan performance

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.