नवी दिल्ली - Gurucharan Singh Missing : चार दिवसांपासून बेपत्ता असलेला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोधी याच्या हरवल्याच्या घटनेला विचीत्र वळण मिळालं आहे. त्याच्या गायब होण्य्याच्या बातमीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या मालिकेमध्ये रोशन सिंग सोधी या भूमिकेसाठी ओळखला जाणारा ५० वर्षीय अभिनेता गुरुचरण 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी विमानात निघालेले असताना तो मुंबईत पोहोचलेच नसल्यामुळे खळबळ उडाली आहे.
एका बातमीनुसार गुरुचरण बेपत्ता झाल्याबद्दल त्याचे वडील हरगित सिंग यांनी दिल्लीच्या पालम पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. घरमालक वंश धारिवाल यांनी खुलासा केला की गुरुचरणचे आई-वडील गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीत राहत होते आणि अभिनेता गुरुचरण अनेकदा त्यांना भेटायला जायचा. मात्र, त्याची शेवटची भेट अचानक आटोपली आणि तो कोणताही मागमूस न लागता तो गायब झाला.
घरमालकाने सांगितले की, पोलीस गेल्या दोन दिवसांपासून सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, मात्र आतापर्यंत त्यांनी फक्त गुरुचरणने कोणते कपडे घातले होते ते तपासले आहे. "गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोलीस येत आहेत, कॅमेरे तपासत आहेत, पण त्यांनी फक्त त्याने काय परिधान केले आहे ते पाहिले आणि इतर कोणताही मागमूस लागलेला नाही." असे घरमालक वंश धारिवाल यांनी सांगितलं.
गुरुचरणचा शेजारी आकाशने सांगितलं की, "कधी कधी तो पालकांना भेटायला यायचा. तो जेव्हाही यायचा तेव्हा मुलांना खूप प्रेमाने भेटायचा आणि फोटोही काढायचा. आम्हाला काल कळलं की तो बेपत्ता आहे."
पोलिसांनी आत्तापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 365 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली ते मुंबईच्या फ्लाइटमध्ये चढताना गुरुचरणला 22 एप्रिल रोजी शेवटचे पाहिले गेले होते.
रोशन सिंग सोधी या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या गुरुचरणने 2020 मध्ये कौटुंबिक कारणांमुळे आणि पेमेंटच्या समस्यांमुळे शो सोडला होता आणि त्याच्या पात्राची जागा अभिनेता बलविंदर सिंग सुरी यांनी घेतली होती.
हेही वाचा -
- 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'रोशन सिंग सोढी बेपत्ता, जेनिफर बन्सीवालनं दिली प्रतिक्रिया... - Gurucharan Singh Missing
- 'फेमिनिज्म'वर वादग्रस्त विधान दिल्यानं नोरा फतेही चर्चेत, सोनाली बेंद्रे आणि श्रिया पिळगावकरनं दिली प्रतिक्रिया - Nora Fatehi Sonali Bendre
- 20 वर्षांनी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाला विजयचा ‘घिल्ली’, चित्रपटाची कमाई ऐकून तुम्हीही व्हाल चकित - Thalapathy Vijay