ETV Bharat / entertainment

प्रतीक्षा संपली, प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर होणार 'या' दिवशी रिलीज... - Kalki 2898AD Trailer - KALKI 2898AD TRAILER

Kalki 2898AD Trailer : प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'कल्की 2898 एडी'च्या ट्रेलर रिलीजची डेट जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होईल याबद्दल जाणून घ्या.

Kalki 2898AD Trailer
कल्की 2898 एडी (कल्कि 2898 एडी ट्रेलर डेट (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 11:24 AM IST

मुंबई - Kalki 2898AD Trailer : अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी स्टारर 'कल्की 2898 एडी' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचे चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. आज 5 जून रोजी या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट या महिन्यात 27 जून रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. याआधी प्रभासच्या चाहत्यांना 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार यासाठी बातमी वाचा...

ट्रेलर कधी होईल रिलीज? : नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेला, 'कल्की 2898 एडी' हा एक पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये महाभारत ते इसवी सन 2898 पर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक साऊथ कलाकारांनी कॅमिओ केला आहे.'कल्की 2898 एडी' चित्रपटात अनेक सरप्राईज प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर 10 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ट्रेलरची रिलीज तारीख जाहीर केली आहे.

'कल्की 2898 एडी' चित्रपटाबद्दल : या चित्रपटात प्रभास ॲक्शन करताना दिसणार आहे. अलीकडेच रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रपटाबाबत एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रभास आणि 'कल्की 2898 एडी'ची संपूर्ण टीम पोहोचली होती. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि टीझर रिलीज केल्यानंतर, 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचा ट्रेलर काय करिष्मा करतो हे काही दिवसानंतर कळेल. दरम्यान या चित्रपटाला संगीत संतोष नारायणन यांनी दिलंय. 'कल्की 2898 एडी' चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत झळकणार आहे. वैजयंती मूव्हीज आणि सी. आसवानी दत्त अंतर्गत हा चित्रपट निर्मित केला गेला आहे. हा चित्रपट सुमारे 600 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सानिया मिर्झानं केला 'प्रेमाच्या शोधात' असल्याचा खुलासा - Sania Mirza
  2. अर्जुन रामपालनं रचला इतिहास, 'चाइल्ड रिलीफ अ‍ॅन्ड यू' अमेरिकेसाठी 1.5 डॉलर दशलक्ष केलं जमा - arjun rampal
  3. वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन... - Varun Dhawan and Natasha Dalal

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.