मुंबई - FAMILY STAR RELEASE : विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांच्या भूमिका असलेला 'फॅमिली स्टार' हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित या चित्रपटानंं प्रेक्षकांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी सर्वच कलाकारांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे येथे प्रदर्शित होणारा 'फॅमिली स्टार' हा पहिला भारतीय चित्रपट ठरणार असल्याची बातमी नुकतीच हाती आली आहे.
उरुग्वेत रिलीज होणारा पहिला भारतीय चित्रपट होण्याचा मान फॅमिली स्टारनं मिळाल्याचं निर्मात्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. भारत आणि उरुग्वे देशामध्ये असलेल्या दृकश्राव्य क्षेत्रातील चांगल्या संबंधामुळे ही किमया घडली आहे. मार्च 2023 मध्ये भारतातील उरुग्वेच्या राजदूतानं या सहकार्याचे आणि दोन्ही देशांच्या चित्रपट उद्योगांमध्ये मजबूत संबंध वाढवण्याबाबतचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. 'फॅमिली स्टार' हा चित्रपट 5 एप्रिल रोजी भारतात प्रदर्शित होत असताना, तो एक दिवस आधी उरुग्वेमध्ये मोठ्या पडद्यावर दाखल होईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, निर्मात्यांनी आता 'देखो रे देखो' गाण्यासाठी एक लिरिकल व्हिडिओ लॉन्च केला आहे. यापूर्वी रिलीज करण्यात आलेल्या या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. यामुळे हा एक कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट असल्याची खात्री प्रेक्षकांना वाटू लागली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
''फॅमिली स्टार' चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. विजय देवराकोंडा आणि मृणाल ठाकूर यांच्याव्यतिरिक्त, या चित्रपटात वासुकी, अभिनय, रवी बाबू, वेनेला किशोर, रोहिणी हट्टंगडी आणि रश्मिका मंदान्ना यासारख्या प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे.
हेही वाचा -